प्रवीण दरेकर यांची मुंबई पोलिसांकडून ३ घंटे चौकशी !

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी मजूर म्हणून स्वत:ची नोंदणी केल्याच्या प्रकरणी ४ एप्रिल या दिवशी मुंबई पोलिसांनी अधिकोषाचे माजी अध्यक्ष आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची ३ घंटे चौकशी केली.

उरलेल्या अडीच वर्षांत तरी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे ! – शरद पोंक्षे, ज्येष्ठ अभिनेते

आजही याच महाराष्ट्रात औरंगजेबाच्या नावाने एक शहर आहे. ‘त्या औरंगाबादचे संभाजीनगर व्हावे’, असे कुठल्याही राज्यकर्त्याला वाटत नाही, हे मोठे दुर्दैव आहे.

अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथे पुजार्‍याची चाकूने वार करून हत्या !

मंदिराजवळ आरोपी तरुण पांडुरंग शेप याचे घर असून पाठक यांच्यावर आक्रमण करण्यापूर्वी तो घराबाहेर बसून चाकूने बीट कापून खात होता. पुजारी पाठक यांना पहाताच त्यांना त्याने दारात बोलावले आणि अचानक त्याने त्यांच्यावर चाकूने वार केले.

भोंगे उतरवण्याच्या न्यायालयाच्या कायद्याची आधी कार्यवाही करा !

हिंदूबहुल देशात हिंदूंना ध्वनीक्षेपकावर ‘हनुमान चालिसा’ लावण्याची बंदी आणि मशिदींवरील भोंगे अनेक वर्षे चालू आहेत. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ?

हिंदूंचाही सन्मान झालाच पाहिजे ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

बाकी सर्व धर्मांचा सन्मान करायचा आणि केवळ हिंदूंवर बंधने लादायची, असे चालणार नाही. सर्वधर्मसमभावामध्ये हिंदूंचाही सन्मान झाला पाहिजे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

कोल्हापूरमधील मुक्त सैनिक वसाहतीमधील माझ्या सभेत दगडफेक ! – चित्रा वाघ, भाजप

भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या सभेमध्ये झालेली दगडफेक ही नियोजनबद्ध आणि ‘स्टेज मॅनेज घटना’ होती, असा आरोप गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना केला आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास रंगवला गेला ! – सु.ग. शेवडे, ज्येष्ठ इतिहासकार

सु.ग. शेवडेगुरुजी म्हणाले, ‘‘छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास जनतेसमोर आणलाच गेला नाही. ज्या महिला जन्मालाच आल्या नव्हत्या, अशा महिला निर्माण करून त्यांच्याशी संभाजी महाराज यांचा संबंध जोडण्यात आला. त्यांना व्यसनी असल्याचे भासवण्यात आले.’’

पाकिस्तानी लोकशाही !

पाकचा जन्म झाल्यापासून गेल्या ७५ वर्षांत एकाही सरकारने त्याचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. यामागे विविध कारणे असली, तरी मुख्य कारण हे पाकचे सैन्य आहे. त्यातही लोकांनी सरकार निवडून दिले, तरी सैन्याचे धोरण आणि आदेश यांनुसारच ते काम करत असल्याचे पाकच्या जनतेलाही ठाऊक असते.

चिमण्या वाचवा !

निसर्गातील प्रत्येक सूक्ष्मातीसूक्ष्म जिवाचे नैसर्गिक जीवनचक्र चालवण्यात मोठा वाटा असतो. यामुळे आपणही उन्हाळ्यात चिमण्यांसाठी आगाशीत पाणी ठेवूया. त्यांच्यासाठी घरटे, खाद्य ठेवू शकतो. मुख्यतः आपली प्रगती म्हणजे दुसर्‍या जिवाची, निसर्गाची अधोगती करणे नव्हे !

कुरकुंभ (पुणे) येथील रसायन चोरीप्रकरणी १० आरोपींना अटक !

दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहतीतील मेल्झर केमिकल्स प्रा. लि. या आस्थापनामधून ५ मार्च या दिवशी ४८ लाख ५० सहस्र ९१४ रुपये मूल्याच्या ‘नायट्रो मिथेन’ या रसायनाची चोरी झाली होती.