
अंबाजोगाई (जिल्हा बीड) – शहरापासून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या शेपवाडी येथील हनुमान मंदिरातून गुढीपाडव्याच्या दिवशी पूजा करून घरी परतणारे पुजारी संतोष पाठक यांच्यावर एका तरुणाने चाकूने वार केले. त्यामध्ये पुजारी पाठक यांचा मृत्यू झाला. मंदिराजवळ आरोपी तरुण पांडुरंग शेप याचे घर असून पाठक यांच्यावर आक्रमण करण्यापूर्वी तो घराबाहेर बसून चाकूने बीट कापून खात होता. पुजारी पाठक यांना पहाताच त्यांना त्याने दारात बोलावले आणि अचानक त्याने त्यांच्यावर चाकूने वार केले. आरोपी शेप याला अटक करून त्याच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे, तसेच त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
घटना घडत असतांना ३ महिलांनी आरोपीवर दगडफेक करत पूजार्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर घायाळ झालेल्या पुजार्यांना ग्रामस्थांनी स्वाराती रुग्णालयात भरती केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अद्याप हत्येचे कारण स्पष्ट झालेले नसून पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी सांगितले, ‘आरोपी पांडुरंग अच्युत शेप हा मनोरुग्ण असून त्याच्यावर औषधोपचार चालू आहेत. हत्या केल्यानंतर तो स्वत: पोलीस ठाण्यात उपस्थित झाला आहे. आम्ही त्याच्याकडे अनेक गोष्टींची विचारपूस केली; मात्र तो काहीच बोलत नाही.’ ‘पुजारी संतोष पाठक हे मीतभाषी, अजातशत्रू आणि सर्वांशी हसतमुखाने बोलणारे होते’, असे समजते.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !
‘महावितरण’कडून पुणे परिमंडलात १५ दिवसांत १ सहस्र २८१ वीजचोरांवर कारवाई !