राज्यात दहावी आणि बारावीची परीक्षा ही ‘ऑफलाईन’च होईल !

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली. दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल, तर बारावीची लेखी परीक्षा ४ ते ३० मार्च या कालावधीत होतील.

पुण्यात इमारतीचे बांधकाम चालू असतांना लोखंडी जाळी कोसळून ५ कामगारांचा मृत्यू !

राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांसाठी ५ लाख रुपयांचे साहाय्य देण्यात येणार आहे, तसेच या दुर्घटनेच्या चौकशीचे निर्देश पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत.

मध्य रेल्वेवर ३ दिवस मेगाब्लॉक : अनेक एक्सप्रेस, लोकल रहित

बहुप्रतिक्षित पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी हा मोठा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवरील या मार्गिका चालू झाल्यास लोकलच्या प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे, अशी माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाने दिली आहे.

जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे बेपत्ता !

लाचलुचपत विभागातील पोलीस निरीक्षक संग्राम ताटे २ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ७ वाजल्यापासून अचानक बेपत्ता झाले आहेत. मित्राला भेटायला जात आहे, असे पत्नीला सांगून ते घरातून बाहेर पडले होते.

नागपूर महापालिकेत ५ कोटी ४७ लाख रुपयांची २५९ बनावट कंत्राटे चौकशी समितीने उघडकीस आणली !

महापालिकेच्या स्टेशनरी साहित्य खरेदीत घोटाळा झाल्याचे प्रकरण

पुण्यातील मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाला मान्यता !

हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरवतांना नदीपात्रातून जाणारे काही रस्ते बंद करून पर्यायी मार्ग सिद्ध केले जाणार आहेत, तर नदीच्या पातळीपर्यंत असलेले बाबा भिडे पूल, अमृतेश्वर पूल आदी काढून ते उंच करावे लागणार आहेत.

नाशिक येथील डॉ. सुवर्णा वाजे हत्याप्रकरणी पती संदीप वाजे पोलिसांच्या कह्यात !

महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांचा घातपात झाला असून त्यांचे पती संदीप हेच मुख्य संशयित आरोपी आहेत.

विश्ववंद्य ‘हिंदु राष्ट्र’ हवेच !

‘वर्धिष्णुर्विश्ववन्दिता’ म्हणजे हिंदु धर्मराष्ट्राचे तेज वर्धिष्णु होत जाऊन विश्ववंदनीय होणार आहे. येणारा काळ हा महातेजस्वी असून हे गौरवशाली भविष्य साकारण्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी हिंदूंनो, साधना करा, आपले धर्मतेज वृद्धींगत करा अन् हिंदु राष्ट्राच्या दैवी कार्यास हातभार लावा ! जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् !

वसई आणि विरार या शहरांतील अवैध गोमांस विक्री करणार्‍यांवर कारवाई करा ! – अजिंक्य बगाडे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त

महानगरपालिकेकडून गुन्हे नोंद असलेल्या विक्रेत्यांना परवाने दिलेच कसे गेले ? हेही आयुक्तांनी स्पष्ट केले पाहिजे !

भाविकांनी ७ फेब्रुवारी या दिवशी श्री काशीविश्वेश्वर मंदिरात उपस्थित रहाण्याचे आवाहन ! : कीर्तन महोत्सवाचे नियोजन

प्रतिवर्षीप्रमाणे श्री माधवराव गाडगीळ मित्रपरिवार, श्री दासबोध अभ्यास मंडळ, गीता फाऊंडेशन आणि काशीविश्वेश्वर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च या कालावधीत ‘महाशिवरात्र कीर्तन महोत्सवा’चे नियोजन करण्यात आले आहे.