
नाशिक – महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांचा घातपात झाला असून त्यांचे पती संदीप हेच मुख्य संशयित आरोपी आहेत. संदीप यांना पोलिसांनी कह्यात घेतले असून वाहनामध्ये जळलेली हाडे डॉ. वाजे यांचीच आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी येथे ३ फेब्रुवारी या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस अधीक्षक सचिन पाटील पुढे म्हणाले की,
१. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वाजे या २५ जानेवारी या दिवशी मोरवाडी येथील रुग्णालयात कामावर गेल्या होत्या. रात्री कामावरून त्या घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या; परंतु त्या घरी न पोचल्याने कुटुंबियांनी त्यांच्या माहेरी, तसेच अन्य नातेवाईक यांच्याकडे चौकशी केली.
२. कोणतीही माहिती न मिळाल्याने अंबड पोलीस ठाण्यात डॉ. वाजे हरवल्याची तक्रार प्रविष्ट करण्यात आली होती. या कालावधीत वाडीवर्हे रायगड नगरजवळ रस्त्याच्या कडेला चारचाकी वाहनात पूर्णत: जळालेल्या अवस्थेत त्यांचा सांगाडा आढळून आला.
३. संदीप याची सखोल चौकशी केली असता त्याने साथीदारांसह डॉ. सुवर्णा यांचा घातपात केल्याचे मान्य केले. या घटनेतील ७ संशयितांची चौकशी चालू आहे.
४. डॉ. सुवर्णा आणि संदीप यांच्यात काही वर्षांपासून वाद चालू होता. इतरही काही कौटुंबिक वाद होते. यामुळे हे टोकाचे पाऊल उचलले गेले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
२२ ते २४ जून या कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीदेवीच्या मूर्तीचे संवर्धन होणार !
नवीन घाटांची कामे जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रशासनाचा आदेश
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
Bahraich Talaq : सासर्याने बलात्कार केल्याचे सांगताच पती रेहानकडून पत्नीला तलाक !
असाहाय्य हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग : वडिलांना जिवे मारण्याची धमकी !
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !