मिरज, ४ फेब्रुवारी (वार्ता.) – प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्री माधवराव गाडगीळ मित्रपरिवार, श्री दासबोध अभ्यास मंडळ, गीता फाऊंडेशन आणि काशीविश्वेश्वर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च या कालावधीत ‘महाशिवरात्र कीर्तन महोत्सवा’चे नियोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून हा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाचा संकल्प माघ शुक्ल (रथ) सप्तमी म्हणजेच ७ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ९ वाजता श्री काशीविश्वेश्वराच्या पिंडीवर जलाभिषेक करून सोडण्यात येणार आहे. तरी सर्व भाविकांनी ७ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ९ वाजता श्री काशीविश्वेश्वर मंदिरात उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. माधवराव गाडगीळ यांनी केले आहे.