जालना – येथील लाचलुचपत विभागातील पोलीस निरीक्षक संग्राम ताटे २ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ७ वाजल्यापासून अचानक बेपत्ता झाले आहेत. मित्राला भेटायला जात आहे, असे पत्नीला सांगून ते घरातून बाहेर पडले होते. ते येथील यशवंतनगर परिसरात रहातात. या वेळी त्यांनी भ्रमणभाष आणि वाहन समवेत नेले नव्हते. ताटे यांच्या पत्नीने कदीम जालना पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाले असल्याची तक्रार प्रविष्ट केली आहे. पोलिसांनी त्यांचा शोध चालू केला आहे.