मध्य रेल्वेवर ३ दिवस मेगाब्लॉक : अनेक एक्सप्रेस, लोकल रहित

मुंबई – मध्य रेल्वेवर ठाणे ते दिवा स्थानकाच्या दरम्यान ४ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून ७२ घंट्यांचा (३ दिवस) मेगाब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉकमुळे ३५० लोकल, तसेच १०० हून अधिक लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस आणि मेल गाड्या रहित करण्यात आल्या आहेत. बहुप्रतिक्षित पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी हा मोठा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवरील या मार्गिका चालू झाल्यास लोकलच्या प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे, अशी माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाने दिली आहे. ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान ५ वी मार्गिका, दिवा ते ठाणे स्थानकादरम्यानच्या ‘अप जलद मार्गिके’वर आणि ६ व्या मार्गिकेवर हा मेगाब्लॉक असणार आहे.

कोणत्या एक्सप्रेस गाड्या रहित होणार ?

• डेक्कन एक्सप्रेस

• डेक्कन क्वीन एक्सप्रेस

• जालना जनशताब्दी

• कोयना एक्सप्रेस

• पंचवटी एक्सप्रेस

• कोकणात जाणार्‍या सर्व गाड्या

१०० एक्सप्रेस गाड्या ३ दिवस रहित करण्यात आल्या आहेत. सर्व जलद लोकल धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.