१० वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन २२ आणि २३ जानेवारी या दिवशी खोपोली (जिल्हा रायगड) येथे होणार !

दहावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन २२ आणि २३ जानेवारी या दिवशी रायगड जिल्ह्यातील खोपोली, खालापूर येथील हॉटेल नोव्हाटेल ईमॅजिका येथे होणार आहे.

हवेली तालुक्याच्या भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अशासकीय सदस्यपदी चंद्रकांत वारघडे यांची नियुक्ती !

श्री. चंद्रकांत वारघडे हे माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष असून माहिती अधिकार कायद्याचे तज्ञ अभ्यासक आहेत. माहिती अधिकाराविषयी त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्यानेही दिली आहेत.

महाराष्ट्रात मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांना आता गड आणि दुर्ग यांची नावे देण्यात येणार !

लोकप्रतिनिधींना केवळ निवासस्थानांना नावे देण्यापुरता नको, तर गड-दुर्ग यांची दुरवस्था दूर करून त्यांच्याविषयी अभिमान दाखवायला हवा, असेच जनतेला वाटते !

पुण्यात बनावट आधार कार्ड बनवून देणारी टोळी उघडकीस, २ धर्मांधांना अटक !

प्रत्येक गुन्ह्यात धर्मांधांचा सहभाग असणे देशासाठी चिंताजनक ! गुन्हेगारीतील वाढत्या धर्मांधांच्या सहभागातून त्यांना कायद्याचा धाक नाही, हे परत परत सिद्ध होत आहे. गुन्हेगारी वृत्तीच्या धर्मांधांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ हा उपक्रम राबवण्याविषयी कोल्हापूर प्राथमिक शिक्षण विभागाचे सर्व गट शिक्षणाधिकार्‍यांना पत्र

हिंदु जनजागृती समितीने दिलेल्या निवेदनाची नोंद घेत गटशिक्षणाधिकार्‍यांना त्यावर कार्यवाही करण्याचे पत्र पाठवणार्‍या प्राथमिक शिक्षण विभागाचे अभिनंदन !

‘हिंदु टास्क फोर्स’चे संस्थापक अधिवक्ता खुश खंडेलवाल यांच्याकडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण !

श्री साईबाबा संस्थानच्या अध्यक्षांना राज्यमंत्र्यांचा दर्जा

मंदिरे सरकारच्या कह्यात गेली, तर भाविकांनी श्रद्धेने मंदिरात अर्पण केलेल्या धनाचा वापर देवस्थान आणि धर्मकार्य यांसाठी खर्च न होता, तो मंत्र्यांच्या सोयीसुविधा, सामाजिक कामे, सरकारी कामे, अन्य धर्मियांच्या संस्था यांसाठी खर्च होतोे.

यापुढे कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमाला अनुमती दिल्यास विरोध करू ! – अजयसिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना

वर्ष १८१८ मध्ये कोरेगाव भीमा येथे झालेले युद्ध जातीय नव्हते. इंग्रजांनी केलेला हा शुद्ध अपप्रचार आहे. समकालीन संदर्भ आणि पुरावे पडताळले असता हे सिद्ध होते.

‘नथुराम’ आणि पुरोगाम्यांचे अजीर्ण !

या चित्रपटाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या पठडीतील पुरोगामी यांचेही पितळ उघडे पडले आहे. खासदार कोल्हे आणि त्यांच्या पक्षातील पदाधिकार्‍यांना जी सारवासारव करावी लागत आहे, त्याला नियती म्हणतात ! ती आज नाही उद्या तुम्हाला लोळवतेच ! म्हणून नेहमी सत्याची आणि धर्माची कास धरावी !

लोकप्रतिनिधींचे वागणे आदर्शच हवे !

नाना पटोलेंसारख्या लोकप्रतिनिधींनी आणि राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या नेत्याने देशाच्या पंतप्रधानांविषयी अत्यंत खालच्या स्तराला जाऊन वक्तव्य करणे, हे अत्यंत लाजिरवाणे अन् संस्कृतीला काळीमा फासणारे आहे.