‘हिंदु टास्क फोर्स’चे संस्थापक अधिवक्ता खुश खंडेलवाल यांच्याकडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण !

अधिवक्ता खुश खंडेलवाल

भाईंतर, ठाणे (वार्ता) – हिंदु टास्क फोर्सचे संस्थापक अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

नाना पटोले

अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, ‘भा.दं.वि.चे कलम १५३, ५०४, ५०५ आणि ५०६ च्या अंतर्गत नाना पटोले यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा, तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्या वक्तव्याची पडताळणी करून लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करावी.’

काही दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील एका गावात समर्थकांसमोर बोलतांना नाना पटोले यांनी ‘मी मोदी यांना मारू शकतो. शिव्या देऊ शकतो’, असे वक्तव्य केले होते. याविषयीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. त्यानंतर पटोले यांनी ‘हे वक्तव्य मोदी नावाच्या गावगुंडाविषयी केले’, असे स्पष्टीकरण दिले; मात्र मोदी नावाचा कुणीही गुंड गावात नसल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितल्यामुळे नाना पटोले यांचा खोटारडेपणा उघड झाला.