पुण्यात बनावट आधार कार्ड बनवून देणारी टोळी उघडकीस, २ धर्मांधांना अटक !

७०० रुपयांत बांगलादेशी नागरिकांना दिले जात होते आधार कार्ड !

प्रत्येक गुन्ह्यात धर्मांधांचा सहभाग असणे देशासाठी चिंताजनक ! गुन्हेगारीतील वाढत्या धर्मांधांच्या सहभागातून त्यांना कायद्याचा धाक नाही, हे परत परत सिद्ध होत आहे. गुन्हेगारी वृत्तीच्या धर्मांधांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे. – संपादक 

जोरना शेख आणि अजीज शेख 

पुणे – बी.टी. कवडे रस्ता येथील ‘स्काय स्टार मल्टि सर्व्हिसेस’ येथे बनावट आधार कार्ड बनवून देत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पुणे पोलिसांच्या विशेष शाखेने या ठिकाणी धाड टाकून अजीज शेख आणि जोरना शेख यांना अटक केली आहे. संबंधित आरोपी बांगलादेश आणि इतर देशांतून अवैधपणे भारतात घुसखोरी केलेल्या नागरिकांना बनावट आधार कार्ड सिद्ध करून देत होते. त्यासाठी लागणारा खोटा रहिवासी पुरावा आणि इतर कागदपत्रे सिद्ध केली जात होती. या वेळी पोलिसांना कोरेगाव पार्क येथील एका नगरसेवकाचा शिक्का आणि हुबेहूब स्वाक्षरी केलेला अर्ज सापडला आहे. एका आधार कार्डसाठी आरोपी ७०० रुपये आकारत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.

या वेळी आरोपींकडे नवीन आधार कार्ड सिद्ध करण्यासाठी तसेच आधार कार्डची माहिती दुरुस्त करण्यासाठीचे शासनाने निर्धारित केलेले १० अर्ज आढळले आहेत. संबंधित अर्जावर १० वेगवेगळ्या व्यक्तींची नावे होती. संबंधित आरोपी पुण्यातील नगरसेवकांच्या नावाने असलेल्या रबरी शिक्क्यांचा वापर करत असे. आरोपींनी अनेक विदेशी नागरिकांना अशाप्रकारे बनावट आधार कार्ड बनवून दिल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.