मुंबई – दहावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन २२ आणि २३ जानेवारी या दिवशी रायगड जिल्ह्यातील खोपोली, खालापूर येथील हॉटेल नोव्हाटेल ईमॅजिका येथे होणार आहे. यामध्ये संतपरंपरा, संत नामदेव महाराज यांची सामाजिक भूमिका, महिला संतपरंपरा आदी विषयांवर परिसंवाद होणार आहेत. कोरोनाचे सर्व नियम पाळून हे संमेलन होणार असल्याची माहिती वारकरी साहित्य परिषदेचे सचिव डॉ. सदानंद मोरे यांनी दिली. या संमेलनाचे उद्घाटन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार असून स्वागताध्यक्षपदी राज्यमंत्री आणि रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे या असणार आहेत. संमेलनाचे अध्यक्षपद हेदू येथील ह.भ.प. आचार्य बाळासाहेब महाराज भूषवणार आहे.