कोकण रेल्वेमार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात पालट

मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणार्‍या ठाणे ते दिवा या रेल्वेमार्गावर २३ जानेवारी या दिवशी दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे याचा परिणाम कोकण रेल्वेमार्गावर धावणार्‍या रेल्वे गाड्यांवर होणार असून काही गाड्या रहित करण्यात आल्या आहेत

शासकीय सेवेतून बडतर्फ केल्याने आधुनिक वैद्य नीरज कदम यांची कारागृहात रवानगी !

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांचा विरोध !

मतपेढीच्या पुढे लाचार होऊन अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणारे कधीतरी कायद्याचे राज्य देऊ शकतील का ?

नाना पटोले यांना अटक होईपर्यंत साखळी उपोषण चालूच राहील ! – मंगलप्रभात लोढा, आमदार आणि मुंबई अध्यक्ष, भाजप

आमदार मंगलप्रभात लोढा म्हणाले की, नाना पटोले यांचे वागणे म्हणजे ‘विनाशकाले विपरितबुद्धी ।’, असे झाले असून नाना पटोले वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात गरळ ओकत आहेत.

राज्यातील शाळा, महाविद्यालये २४ जानेवारीपासून चालू करण्यास अनुमती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावास सहमती दर्शवली असून स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे सर्व वर्ग चालू होणार आहेत.

नाशिक येथे २५ मार्चपासून मुस्लिम मराठी साहित्य संमेलन !

मराठी भाषेच्या शुद्धीसाठी मुसलमान आक्रमकांकडून मराठीत आलेले उर्दू, तसेच फारसी, अरबी शब्द काढून टाकून छत्रपती शिवाजी महाराजांनी भाषाशुद्धी केली. त्यामुळे मुस्लिम मराठी साहित्य संमेलन ही संकल्पनाच निरर्थक आहे !

हिंदवी स्वराज्याच्या आरमाराचा पाया असलेल्या कल्याण (जिल्हा ठाणे) येथील दुर्गाडी गडावरही धर्मांधांचे अतिक्रमण !

हिंदूंची अस्मिता असणार्‍या ऐतिहासिक गडांचे ‘हिरवेकरण’ होऊ देणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

परमबीर सिंह-सचिन वाझे गुप्त भेटीप्रकरणी नवी मुंबई पोलिसांतील चार जणांना ‘कारणे दाखवा’ नोटीस !

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह काही दिवसांपूर्वी चांदीवाल आयोगासमोर उपस्थित झाले होते. तेव्हा परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांची एका घंट्यासाठी भेट झाली होती, असे समोर आले आहे…

अपहरणकर्ता चीन !

भारत सरकारने आता या घटनेच्या निमित्ताने चीनला कुटनीती किंवा सर्जिकल स्ट्राईक यांसारख्या काही अन्य उपाययोजना काढून चीनला चांगलाच धडा शिकवायला हवा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही हे सूत्र नेऊन वाचा फोडायला हवी.

संभाजीनगर येथे महिलेला गुंगीचे औषध देऊन अत्याचार करणार्‍या मुश्ताक शेख याला अटक !

महिलांवरील अत्याचारांमध्ये धर्मांधाचा सहभाग ही त्यांची वासनांध वृत्ती दर्शवत नाही का ? अशा धर्मांधांना कठोर शिक्षाच होणे अपेक्षित आहे !