संभाजीनगर येथे महिलेला गुंगीचे औषध देऊन अत्याचार करणार्‍या मुश्ताक शेख याला अटक !

अल्पसंख्य म्हणवणारे धर्मांध गुन्हेगारीमध्ये मात्र बहुसंख्य हे चिंताजनक ! – संपादक 

महिलांवरील अत्याचारांमध्ये धर्मांधाचा सहभाग ही त्यांची वासनांध वृत्ती दर्शवत नाही का ? अशा धर्मांधांना कठोर शिक्षाच होणे अपेक्षित आहे ! – संपादक 

(प्रतिकात्मक छायाचित्र)

संभाजीनगर – अनेक आधुनिक वैद्यांकडे उपचार घेऊनही डोकेदुखी बरी न झाल्याने एक महिला भोंदू हकीम मुश्ताक शेख उमर शेख (मूळ मालेगाव, नाशिक, ह.मु. रहेमानिया कॉलनी) याच्याकडे उपचारासाठी गेली होती. त्या वेळी हकीम शेख याने महिलेला गुंगीचे औषध देऊन तिला बेशुद्ध केले आणि तिच्यावर अत्याचार केले. हा प्रकार महिलेच्या लक्षात येताच तिने ७ डिसेंबर २०२१ या दिवशी बेगमपुरा पोलीस ठाण्यात शेख याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली होती.

८ डिसेंबर २०२१ या दिवशी गुन्हा नोंद झाल्या तेव्हा भोंदू हकीम शेख पसार झाला होता. जवळजवळ दीड मास त्याचा शोध घेऊन अखेर १९ जानेवारी या दिवशी पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयाने आरोपी शेख याला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.