वर्धा येथील अवैध गर्भपाताचे प्रकरण

वर्धा – जिल्ह्यातील आर्वी येथील गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी आधुनिक वैद्या रेखा कदम यांचे पती आधुनिक वैद्य नीरज कदम यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत. भ्रूणहत्या, शासकीय रुग्णालयातील औषध पुरवठा आणि वन्य प्राण्याची कातडी आढळून येणे या प्रकरणी पोलीस आणि वन विभाग यांच्या वतीने त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. अवैध गर्भपात प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी ६ सदस्यीय समिती गठीत केली आहे.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)