कोकण रेल्वेमार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात पालट

२३ जानेवारी या दिवशी ठाणे ते दिवा मार्गावर दुरुस्तीचे काम

रत्नागिरी – मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणार्‍या ठाणे ते दिवा या रेल्वेमार्गावर २३ जानेवारी या दिवशी दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे याचा परिणाम कोकण रेल्वेमार्गावर धावणार्‍या रेल्वे गाड्यांवर होणार असून काही गाड्या रहित करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांच्या वेळापत्रकात पालट करण्यात आला आहे, याची नोंद प्रवाशांनी घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

वेळापत्रकात पालट झालेल्या गाड्या पुढीलप्रमाणे…

२१ जानेवारी – ‘तिरुअनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस’ ही ‘नेत्रावती एक्सप्रेस’ (गाडी क्रमांक १६३४६) ही गाडी पनवेल स्थानकापर्यंत धावणार आहे.

२२ जानेवारी – मडगाव-मुंबई धावणार्‍या ‘जनशताब्दी एक्सप्रेस’ आणि ‘कोकणकन्या एक्सप्रेस’ या दोन्ही गाड्या पनवेल स्थानकापर्यंतच धावणार आहेत.

२३ जानेवारी –

१. मुंबई-करमळी-मुंबई धावणारी (गाडी क्रमांक २२११९ आणि २२१२०) ‘तेजस एक्सप्रेस’ या गाडीच्या ‘अप आणि डाऊन’ या दोन्ही फेर्‍या रहित करण्यात आल्या आहेत.

२. ‘लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरम् ही ‘नेत्रावती एक्सप्रेस’ पनवेल येथून तिरुअनंतपूरम्साठी सुटणार आहे.

३. ‘मुंबई-मडगाव’ धावणार्‍या ‘जनशताब्दी एक्सप्रेस’ आणि ‘मांडवी एक्सप्रेस’ या दोन्ही गाड्या पनवेल येथून सुटणार आहेत.