बीडमध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या सूचीत २ जिवंत व्यक्तींच्या नावांचा समावेश

अशा चुका होतातच कशा ? यातून नेमका मृत्यू कुणाचा झाला, हे कसे कळणार ? ही चूक कुणाकडून झालेली आहे, त्यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.

सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरून विरोध करू ! – धर्माचार्य माऊली महाराज मुरेकर

राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री, तसेच अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक हे सनातन संस्थेवर बंदी आणण्याची मागणी करत आहेत. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. भविष्यात सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरून विरोध करू, अशी चेतावणी त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

विधीमंडळात उपस्थित झालेल्या प्रश्नांतून महाराष्ट्रात महिलांवर होणार्‍या अत्याचारांची विदारक स्थिती उघड !

विविध उपाययोजनांनंतरही महिलांवरील अत्याचारांत वाढ !

विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली !

विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम राज्यपालांना दिला आहे. त्यांनी लवकर संमती द्यावी, यासाठी त्यांची भेट घेण्यात आली.

पुणे येथील मायलेकींच्या मृत्यूनंतर २९ वर्षांनी न्याय !

या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पीडित महिलेच्या आत्महत्येनंतर २९ वर्षांनी आरोपी पतीला दोषी ठरवून ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा दिली आहे. 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ! – खासदार श्रीरंग बारणे, मावळ (शिवसेना)

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अजूनपर्यंत न मिळणे आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागणे, हे दुर्दैवी !

राष्ट्रीय पत्रकार संघाकडून ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी आणि वीणाताई गावडे ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित !

‘एन्युजे’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात पार पडलेल्या समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनांना आमदारांचा सकारात्मक प्रतिसाद !

या निवेदनांमध्ये पारोळा (जिल्हा जळगाव) किल्ल्याची दुरवस्था, विशाळगडावरील अतिक्रमण, राजापूर येथील धोकादायक पुलाची दुरूस्ती, रत्नागिरी येथील लोकमान्य टिळक यांच्या निवासस्थानाची दुरवस्था आणि अन्य विषय यांचा समावेश आहे.

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक सुनील घनवट यांनी ठाणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या घेतलेल्या भेटीचा वृत्तांत !

ठाणे जिल्ह्यातील आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधी यांची हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी भेट घेतली. या वेळी राष्ट्र-धर्म यांवर होणार्‍या आघातांविषयी त्यांनी सर्वांना माहिती दिली.

हिमंत बिस्व सरमा यांची हिंमत !

प्रखर राष्ट्र आणि धर्म प्रेम, देशासाठी काहीतरी करण्याची तळमळ, तत्त्वनिष्ठता, निर्णय घेण्याची धमक अन् भक्कम वैचारिक दृष्टिकोन स्पष्ट असेल, तर कोणताही निर्णय घेऊ शकतो, हे सरमा यांनी दाखवून दिले आहे. त्यांचा आदर्श इतर मुख्यमंत्र्यांनी घेतल्यास हिंदू आणि भारताच्या अनेक समस्या सुटून हिंदु राष्ट्र मूर्त स्वरूपात येईल !