अशी मागणी करण्याचे धाडस होतेच कसे ?

हिंदूंचे पवित्र तीर्थस्थळ असणार्‍या द्वारका बेटावरील २ द्वीपांवर सुन्नी वक्फ बोर्डाने दावा करत गुजरात उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. द्वारका बेटावर एकूण ८ लहान द्वीप आहेत.

लग्नातील चुकीच्या प्रथा बंद होणे, ही काळाची आवश्यकता !

विवाह म्हणजे शिवरूपी पती आणि शक्तीरूपी पत्नी यांचा संगम होय. असे असतांना यामध्ये काही अनिष्ट प्रघात पडू लागले आहेत. त्यामुळे आपण संस्कृती आणि परंपरा जपत आहोत कि भरमसाट व्यय करून स्वतःची प्रतिष्ठा जपत आहोत ? केवळ दिखावा करतांना कर्जाचा डोंगर, तर आपण उभा करत नाही ना? याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.

नागालँडमध्ये सैनिकांच्या गोळीबारात नागरिकांचा मृत्यू आणि त्यानंतर उमटलेले पडसाद !

अशा घटनेचा लाभ तेथील बंडखोर किंवा आतंकवादी घेतात. नागालँडच्या एखाद्या भागात कामगार परत येत असतील, तर त्या वाहनांमध्ये बंडखोरही लपून येऊ शकतात. सुरक्षादलांचा चुकून कधी गोळीबार झाला, तर त्यात सामान्य नागरिकही मारले जातील. त्यानंतर विरोधकांना ‘बघा, सैनिकांनी सामान्य नागरिकांवर गोळीबार केला’, असा कांगावा करण्यासाठी संधी मिळण्याची शक्यता असते.

भारताने त्याच्या ऐतिहासिक चुका आणि त्रुटी यांतून योग्य तो बोध घेऊन आत्मरक्षणार्थ ‘जशास तसे’ हे मूलतंत्र आत्मसात करणे, ही काळाची आवश्यकता !

आम्हाला उच्च आदर्श स्थापण्यासाठी आत्मरक्षणार्थ ‘जशास तसे’ हे मूलतंत्र आत्मसात करावे लागेल !

श्रीरामाचा विशिष्ट संख्येने जप पूर्ण केल्यावर प.पू. दास महाराज यांना झालेले मारुतीचे दर्शन आणि प.पू. भगवानदास महाराज अन् पू. रुक्मिणीआई यांनी १३ कोटी श्रीरामनाम जप पूर्ण केल्यावर झालेले उद्यापन !

आजच्या अंकात ‘प.पू. दास महाराज यांनी रामनामाचा विशिष्ट संख्येने जप केल्यानंतर त्यांना मारुतीचे दर्शन होणे, प.पू. भगवानदास महाराज आणि पू. रुक्मिणीआई यांनी १३ कोटी रामनामाचा जप पूर्ण झाल्यानंतर झालेले उद्यापन अन् पू. रुक्मिणीआईंच्या प्रार्थनेचे सामर्थ्य’ यांविषयी पाहूया.

देहली येथील सनातनचे संत पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांच्याविषयी संतांनी व्यक्त केलेले मनोगत अन् त्यांच्या संतत्वाविषयी संत आणि साधक यांना मिळालेल्या पूर्वसूचना !

पू. संजीव कुमार स्वत:चा सन्मान सोहळा त्रयस्थपणे अनुभवत आहेत’, असे जाणवत होते. त्यांच्या बोलण्यातूनही त्यांच्यातील अल्प अहं लक्षात येत होता.

हसतमुख, आनंदी आणि समाधानी अन् सेवाभावी वृत्ती असलेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या संभाजीनगर येथील कु. चैताली डुबे !

संभाजीनगर येथे सेवा करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. चैताली डुबे यांची मोठी बहीण सौ. उज्ज्वला चिद्रावार आणि चुलत बहीण सौ. अमृता वडगावकर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

केरळ येथील श्री. साईदीपक यांना ‘ऑनलाईन विशेष संवाद’ कार्यक्रमात अभिप्राय संकलनाची सेवा करतांना आलेल्या अनुभूती

मला एका डोळ्याने बारीक अक्षर वाचतांना त्रास होतो, तरीही मी सेवा चालू केली. मी झोकून देऊन सेवा केल्यावर माझ्या डोळ्यांवर येणारा ताण न्यून झाला. ‘माझ्या डोळ्यांची स्थिती सुधारत आहे’, असे मला जाणवले.

‘काळानुसार नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉक्टर सर्व नियोजन अन् कार्य करून घेत आहेत’, असे देवीने सूक्ष्मातून सांगण्याविषयी साधकाला आलेली अनुभूती

मला दिसले, ‘एक प्रतिष्ठित व्यक्ती सनातनच्या आश्रमात परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना भेटायला येत आहे.’ मला वाटले, ‘ती व्यक्ती अशी अकस्मात कशी येईल ?’ तेव्हा देवीनेच उत्तर दिले, ‘ती व्यक्ती देवीची भक्त आहे. त्यामुळे प्रत्यक्ष दुर्गादेवीनेच गुरुदेवांना भेटण्याचा विचार तिच्या मनात घातला आहे.’