‘कोव्हॅक्सिन’ या स्वदेशी लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यता मिळण्यापासून रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले ! – सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा

यावरून जागतिक स्तरावर भारतीय आस्थापनांचे पाय ओढण्याचे कसे प्रयत्न केले जातात, हे यातून दिसून येते !

हिंदु राष्ट्राचा उद्घोष करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदु राष्ट्रात ‘द्रष्टापुरुष’ म्हणून ओळखले जातील ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णाद्धार, राममंदिराची निर्मिती आणि कलम ३७० हटवणे, या घटनांवरून डॉ. हेडगेवार यांना अपेक्षित असलेला ‘सांस्कृतिक हिंदु राष्ट्रवाद’ आणि सावरकर यांना अपेक्षित असलेला ‘राजकीय हिंदु राष्ट्रवाद’ सत्यात उतरतांना दिसत आहे….

योगी आदित्यनाथ यांना मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न ! – साक्षीदाराचा दावा

अन्वेषण यंत्रणांचा उपयोग हिंदु नेत्यांना गुन्हेगार ठरवण्यासाठी करणे निषेधार्ह आहे !

वेगवान प्रवासासाठी देशात आणखी ७ बुलेट ट्रेन प्रकल्प उभारणार !

देशात आणखी ७ ठिकाणी बुलेट ट्रेनचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल सिद्ध करण्यात येत असल्याची माहिती नॅशनल रेल्वे हायस्पीड कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक यांनी दिली.

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव !

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. (सौ.) नीलम गोर्‍हे यांनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे त्यांना उपसभापतीपदावरून दूर करावे, असा अविश्वासाचा प्रस्ताव विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे सादर केला.

ओबीसी आरक्षणाविना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको !

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या (ओबीसी) आरक्षणाविना नको, असा ठराव एकमताने २७ डिसेंबर या दिवशी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत संमत करण्यात आला.

विशाळगडावर मद्याच्या बाटल्यांचा ढिग आणि मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा

इतका कचरा गोळा होईपर्यंत पुरातत्व विभाग आणि प्रशासन काय करत होते ? पुरातत्व विभाग पांढरा हत्ती बनला असून तो गडकोटांकडे दुर्लक्ष करत असल्याने शेवटी हे कार्य गडकोटप्रेमी आणि शिवभक्तांना करावे लागत आहे, हे पुरातत्व खात्यासाठी लज्जास्पद !

अपक्ष आमदार किरण सरनाईक यांनी केला विधान परिषदेतून सभात्याग !

लोकप्रतिनिधींनी मांडलेले प्रश्न वर्षानुवर्षे रखडणे, हे लोकशाहीचे दुर्दैव !

विनाअनुदानित शाळांतील शिक्षकेतर पदांच्या नियुक्त्यांसाठी शिक्षण विभागातीलच अधिकारी पैसे घेतात !

सर्वच क्षेत्रांतील भ्रष्टाचार्‍यांच्या संदर्भात अशी तत्परतेने कारवाई झाली, तर भ्रष्टाचाराला खीळ बसेल !

परिक्षांच्या संदर्भात वेळप्रसंगी केंद्रशासन नोंद घेऊन कारवाई करेल ! – भारती पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री

राज्यात शासकीय स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांची वारंवार हानी होत असेल, तर वेळप्रसंगी केंद्रशासन नोंद घेऊन कारवाई करेल, अशी चेतावणी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.