कोल्हापूर – राज्यात शासकीय स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांची वारंवार हानी होत असेल, तर वेळप्रसंगी केंद्रशासन नोंद घेऊन कारवाई करेल, अशी चेतावणी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. त्या २६ डिसेंबर या दिवशी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
भारती पवार पुढे म्हणाल्या, ‘‘परीक्षेला जात असतांना, परीक्षा देत असतांना पेपर फुटत असतात. परीक्षा देणारे आणि घेणारे यांनाही नेमके काय चालले आहे, हेच कळेनासे झाले आहे. काळ्या सूचीत टाकलेली आस्थापने, संस्था यांच्याकडे परीक्षेचे दायित्व दिले जाते. तरीही राज्य सरकार नेमके काय कारवाई करत आहे, हेच कळत नाही. कोरोना संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन नियमावलीची कार्यवाही करणे क्रमप्राप्त आहे. हा विषय राजकीय-अराजकीय असा भेद करणारा नाही. सर्वांनीच सतर्क रहाणे आवश्यक आहे.’’