बाबरी ढाचा पाडल्याच्या प्रकरणी निदर्शने करणारे ५ जण कह्यात
फातोर्डा पोलिसांनी अनधिकृतपणे निदर्शने करत असलेले इम्रान महंमद, झबीर शेख,सय्यद इम्तियाज, रईस अंजूम आणि शेख मुजफ्फर या ५ जणांना कह्यात घेतले आहे.
फातोर्डा पोलिसांनी अनधिकृतपणे निदर्शने करत असलेले इम्रान महंमद, झबीर शेख,सय्यद इम्तियाज, रईस अंजूम आणि शेख मुजफ्फर या ५ जणांना कह्यात घेतले आहे.
९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे होणार आहे, अशी घोषणा साहित्य संमेलन महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या भाषणात केली.
सध्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात् एस्.टी.च्या कर्मचार्यांचे कामबंद आंदोलन चालू होऊन अनेक दिवस झाले. या संपामुळे नोकरदार, विद्यार्थी यांच्यासह सर्वसामान्य जनतेची असुविधा होत आहे.
शाळेत उपस्थित रहाणार्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी घरच्या परिस्थितीमुळे अर्धपोटी किंवा उपाशीपोटी रहात असल्याने अध्ययन-अध्यापन यांत त्यांचे लक्ष टिकून रहात नाही. त्यामुळे त्याचा परिणाम शिक्षण प्रक्रियेवर होत आहे.
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या श्री खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाला ५ डिसेंबरपासून प्रारंभ झाला असून ८ डिसेंबरपर्यंत ‘मल्हार महोत्सवा’चे आयोजन पालखी मैदान येथे करण्यात आल्याची माहिती मार्तंड देवस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.
राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एस्.टी. कर्मचार्यांचा संप चालू आहे; मात्र प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी शिवशाही बस चालू करण्यात आल्या आहेत. सध्या एस्.टी.चे ८०५ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.
परमबीर सिंह यांच्यावर राज्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत खंडणी, फसवणूक यांसारखे गुन्हे नोंद झाले आहेत. याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
सनातन पंचांगमध्ये देवता, संत आणि राष्ट्रपुरुष, तसेच क्रांतीकारक यांची चित्रे अथवा छायाचित्रे असतात. सनातन पंचांगाच्या प्रती जाळल्यामुळे ती चित्रे किंवा छायाचित्रेही जाळली गेली. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.
‘किल्ले वंदनगड’चे ‘पीर किल्ले वंदनगड’ करण्याचा धर्मांधांचा डाव फसला !
महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होणे अपेक्षित आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने एकसदस्यीय प्रभाग पद्धतीने प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सिद्ध करण्याचे आदेश महापालिकेला दिले होते…