९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर (जिल्हा लातूर) येथे होणार !

प्रा. कौतिकराव ठाले-पाटील

नाशिक – ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे होणार आहे, अशी घोषणा साहित्य संमेलन महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या भाषणात केली. २ ते ४ एप्रिल २०२२ या कालावधीत हे संमेलन होण्याची शक्यता आहे.

संमेलनामध्ये करण्यात आलेल्या ठरावावर कृती होत आहे ना ? हे पहाण्याचे काम शासनाचे ! – कौतिकराव ठाले पाटील, अध्यक्ष, मराठी साहित्य महामंडळ

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होणारे ठराव बासनात गुंडाळले जात नाहीत. त्यांचे वर्गीकरण करून विषयानुसार ते राज्य किंवा केंद्र शासन यांच्याकडे पाठवले जातात. भारत शासनाकडे पाठवतांना त्यांचे इंग्रजीत भाषांतर करून पाठवले जाते. या ठरावांचा पाठपुरावा करण्याविषयी महामंडळाला सांगितले जाते. त्यासाठी मुंबईत यावे लागत असल्याने पैसे लागतात. त्यामुळे शासनाने स्वत: याकडे लक्ष घालावे.