बाबरी ढाचा पाडल्याच्या प्रकरणी निदर्शने करणारे ५ जण कह्यात

प्रतिकात्मक छायाचित्र

मडगाव, ६ डिसेंबर (वार्ता.) – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या धर्मांध संघटनेकडून ६ डिसेंबर या दिवशी बाबरीचा ढाचा पाडल्याच्या प्रकरणी येथील माथानी साल्ढाणा संकुलाच्या बाहेर अनधिकृतपणे निदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. फातोर्डा पोलिसांनी अनधिकृतपणे निदर्शने करत असलेले इम्रान महंमद, झबीर शेख,सय्यद इम्तियाज, रईस अंजूम आणि शेख मुजफ्फर या ५ जणांना कह्यात घेतले आहे. विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी २ डिसेंबरला पोलीस महासंचालकांची भेट घेऊन त्यांना ‘६ डिसेंबरला पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अनधिकृतपणे फलक लावणे किंवा अन्य माध्यमांतून धार्मिक सलोखा आणि शांती बिघडवण्याची शक्यता आहे’, असे सूचित केले होते.