रझा अकादमीवर बंदी घालावी !

या वेळी महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर, अधिवक्ता देवीदास शिंदे, अधिवक्त्या अंकिता पाटील आणि किरण सोनवणे हे उपस्थित होते.

विधानभवन येथे प्रथमच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन साजरा !

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९ व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने १७ नोव्हेंबर या दिवशी विधानभवन येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा गडावर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी विसर्जनाला जनसंघर्ष सेनेचा विरोध !

कोल्हापूरातील विशाळगडावर तर पुरातत्व विभागाच्या नाकावर टिच्चून अतिक्रमण झाले आहे. त्या विरोधात कधी जनसंघर्ष सेनेने आवाज उठवल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे केवळ ब्राह्मणद्वेषापोटी विरोध करणे हे अनाकलनीय आहे !

मुंबई महापौर काँग्रेसच्या पाठिंब्याविना होणार नाही ! – नसीम खान, माजी मंत्री, काँग्रेस

१७ नोव्हेंबर या दिवशी मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलतांना त्यांनी वरील वक्तव्य केले.

स्त्रियांनो, स्वतःतील स्त्रीशक्तीचा जागर करून दुर्गामातेकडे बळ मागूया ! – कु. नारायणी शहाणे, हिंदु जनजागृती समिती

धर्माचरण आणि स्त्री शक्तीचा जागर करून आदिशक्तीची कृपा संपादन करूया अन् दुर्गामातेकडे बळ मागूया, असे आवाहन समितीच्या कु. नारायणी शहाणे यांनी केले. त्या ऑनलाईन ‘जागर देवीतत्त्वाचा’ या शौर्य जागृती’ व्याख्यानात बोलत होत्या.

गडचिरोली येथे आणखी एका नक्षलवाद्याचा मृतदेह हत्यारासह सापडला !

जिल्ह्यातील गॅरापत्ती कोटगुल अरण्य परिसरात शोधमोहीम राबवत असतांना १६ नोव्हेंबर या दिवशी हत्यारासह एका पुरुष नक्षलवाद्याचा मृतदेह आढळून आला आहे. या नक्षलवाद्याचे नाव सुखलाल परचाकी असे असून तो डी.व्ही.सी.चा सदस्य होता.

अमरावती येथील हिंसाचारात रझा अकादमीसमवेत भाजप आणि युवासेना यांतील लोकांचाही हात !

अमरावती येथे झालेल्या दंगलीमागे रझा अकादमीसह राजकीय पक्षांचाही, म्हणजे; भाजप, तसेच युवा सेना यांचा हात असल्याचा महाराष्ट्र पोलिसांना संशय आहे. असा अहवाल पोलिसांकडून नुकताच गृहविभागाला सादर करण्यात आला आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर सांगली जिल्ह्यातील एका तालुक्यात एका पुरोगामी आणि जात्यंध संघटनेकडून साखरवाटप !

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर त्यांना होणारा विरोध ही मोठी विकृती ! अशांवर सरकारने स्वत:हून कारवाई करणे अपेक्षित आहे !

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचे किल्ल्यांवर विसर्जन करण्यास संभाजी ब्रिगेडचा विरोध !

शिवशाहीर दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचे ११ किल्ल्यांवर विसर्जन करण्यास संभाजी ब्रिगेडने तीव्र विरोध दर्शवला आहे.

दक्षिण मुंबईतील हवा देहलीपेक्षा अधिक विषारी !

देहलीपेक्षा दक्षिण मुंबईतील हवा अधिक प्रदूषित झाल्याचे पडताळणीतून समोर आले आहे. मुंबईतील सध्याच्या वातावरणामुळे श्वसनाचे आजार असलेल्यांच्या श्वासाच्या समस्येत वाढ होते.