गडचिरोली येथे आणखी एका नक्षलवाद्याचा मृतदेह हत्यारासह सापडला !

शोधमोहीम राबवत असतांना नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला

गडचिरोली – जिल्ह्यातील गॅरापत्ती कोटगुल अरण्य परिसरात १२ नोव्हेंबर या दिवशी ‘सी-६०’ चे सैनिक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक उडाली होती. यात सेंट्रल कमिटीचा सदस्य आणि कुख्यात जहाल नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडेसह २६ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. या परिसरात शोधमोहीम राबवत असतांना १६ नोव्हेंबर या दिवशी हत्यारासह एका पुरुष नक्षलवाद्याचा मृतदेह आढळून आला आहे. या नक्षलवाद्याचे नाव सुखलाल परचाकी असे असून तो डी.व्ही.सी.चा सदस्य होता.