
संभाजीनगर – शिवशाहीर दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचे ११ किल्ल्यांवर विसर्जन करण्यास संभाजी ब्रिगेडने तीव्र विरोध दर्शवला आहे. दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांनी ‘राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे यांची लिखाणाच्या माध्यमातून अपर्कीती केली आहे’, असा आरोप करत ‘पुरंदरे यांच्या अस्थींचे कोणत्याही गडावर विसर्जन करू देणार नाही’, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे.
‘११ किल्ल्यांवर अस्थी विसर्जनाचा प्रयत्नही कुणी करू नये. तसा प्रयत्न केल्यास त्याला संभाजी ब्रिगेडच्या पद्धतीने धडा शिकवला जाईल. त्यांचा गडावरून कडेलोटही होऊ शकतो. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याचे दायित्व सर्वस्वी सरकारचे असेल’, अशी चेतावणी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी दिली आहे.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !