नगर आगप्रकरणी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांसह चौघांना अटक !

नगर शहरातील जिल्हा रुग्णालयाला आग लागल्याच्या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात ९ नोव्हेंबर या दिवशी वैद्यकीय अधिकारी आणि २ परिचारिका अशा चौघांना अटक करण्यात आली आहे.

हुतात्मा सैनिक विशाल पवार यांच्यावर अंत्यसंस्कार 

हुतात्मा सैनिक विशाल पवार हे जम्मू-काश्मीर येथील पूंछ (राजौरी) या ठिकाणी ‘१६ मराठा लाईट इंन्फट्री’मध्ये हवालदार म्हणून कर्तव्य बजावत होते.

संप चिघळण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न ! – अनिल परब, परिवहनमंत्री

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांचा संप चिघळावा, यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत, असा आरोप परिवहनमंत्री अनिल परब यांनी केला असून ‘संप मागे घ्यावा’, असे आवाहनही केले आहे.

नाशिक येथील ज्येष्ठ संवादिनीवादक पंडित प्रभाकर दसककर यांचे निधन

येथील ज्येष्ठ संवादिनीवादक पंडित प्रभाकर गोविंदशास्त्री दसककर (वय ९४ वर्षे) यांचे रहात्या घरी १० नोव्हेंबर या दिवशी सायं. ७ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात् ४ मुले, १ मुलगी, सुना, नातवंडे आणि पतवंडे, असा परिवार आहे.

थकीत वेतन न मिळाल्याने जिल्ह्यातील ३ सहस्रांहून अधिक आशासेविकांनी लसीकरणाशी संबंधित काम बंद केले !

आरोग्य विभागाने आशासेविकांना २०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र वारंवार मागणी करूनही थकीत वेतन न मिळाल्याने जिल्ह्यातील ३ सहस्रांहून अधिक आशासेविकांनी लसीकरणाशी संबंधित काम बंद केले आहे.

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर नगरपालिका प्रशासन सज्ज !

कार्तिक शुक्ल पक्ष एकादशी या दिवशी कार्तिकी यात्रा होणार असून या कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येतात. सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुख्याधिकारी यांनी दिली.

जळगाव जिल्ह्याचे खासदार, पालकमंत्री, तसेच पारोळा, चोपडा (जिल्हा जळगाव) येथील शिवसेना आमदारांची घेतली सदिच्छा भेट !

सनातन संस्थेच्या वतीने राबवण्यात येणारे ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ !

संभाजीनगर येथील पोलीस ठाण्यात नवाब मलिक यांच्यावर ‘ॲट्रॉसिटी’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंद !

एन्.सी.बी. संचालक समीर वानखेडे यांच्या आत्या गुंफाबाई भालेराव यांनी राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात ‘ॲट्रॉसिटी’ची पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करून त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दुसर्‍या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीच्या कमरेपर्यंत सूर्यकिरणे !

श्री महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सव !

चेंदवण येथील सनातनचे हितचिंतक देवेंद्र नाईक यांना ‘महाराष्ट्र-गोवा एकता पुरस्कार २०२१’ घोषित

गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांत विविध क्षेत्रांत भरीव काम करणार्‍यांच्या गुणवत्तेचा सन्मान म्हणून हा पुरस्कार दिला जातो. वर्ष २०२१ साठीचा हा पुरस्कार नाईक यांना घोषित झाला आहे.