कुडाळ – तालुक्यातील चेंदवण येथील ‘चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळा’चे मालक तथा सनातनचे हितचिंतक आणि विज्ञापनदाते श्री. देवेंद्र नाईक यांना गोवा राज्य सरकारच्या कला आणि संस्कृति संचालनालयाच्या वतीने ‘महाराष्ट्र-गोवा एकता पुरस्कार २०२१’ घोषित झाला आहे. या पुरस्काराचे वितरण २१ नोव्हेंबर या दिवशी मंगळवार पेठ, कोल्हापूर येथील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोव्यातील आमदार जयेश साळगावकर आणि चित्रपट अभिनेते विश्वजीत पडते यांच्या उपस्थितीत होणार आहे. गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांत विविध क्षेत्रांत भरीव काम करणार्यांच्या गुणवत्तेचा सन्मान म्हणून हा पुरस्कार दिला जातो. वर्ष २०२१ साठीचा हा पुरस्कार नाईक यांना घोषित झाला आहे.