सनातन संस्थेच्या वतीने राबवण्यात येणारे ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ !


जळगाव, ११ नोव्हेंबर (वार्ता.) – सनातन संस्थेच्या वतीने राबवण्यात येणार्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियानां’तर्गत जळगाव जिल्ह्याचे भाजपचे खासदार श्री. उन्मेष पाटील आणि चाळीसगाव येथील भाजप आमदार श्री. मंगेश चव्हाण, तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील, तसेच पारोळा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील, चोपडा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार श्री. चंद्रकांत सोनवणे यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. या वेळी सर्वांना सनातनची अनमोल ग्रंथसंपदा दाखवण्यात आली. त्यांनी याविषयी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सर्वांना ‘सनातन पंचांग – २०२२’ भेट देण्यात आले.



सनातन पंचांग हातात घेताक्षणी गुलाबराव पाटील यांनी ५०० सनातन पंचांगांची मागणी केली, तसेच अभियानांतर्गत मतदारसंघातील सर्व ग्रंथालयांना ही ग्रंथसंपदा देण्याविषयी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले. आमदार मंगेश चव्हाण म्हणाले, ‘‘सनातन संस्थेचे ग्रंथ ग्रंथालयांना देण्यासाठी आमदार निधी उपलब्ध करून देईन. ‘सनातन पंचांग – २०२२’ चांगले असून मला ६२५ पंचांगे द्या.’’
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !
युवकांनी अपप्रचाराला बळी न पडता स्वतःच्या उज्ज्वल भवितव्याकडे लक्ष द्यावे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
डहाणू ते जव्हारपर्यंतची २१ सहस्र २२ झाडे तोडण्याची न्यायालयाची अनुमती !
शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांच्या घरी ३ कोटी ५० लाख रुपयांची चोरी !