गोवा वैद्यकीय महाविद्यालयात लवकरच ‘टेली मेडिसीन’ सेवा

आरोग्य खात्याकडून लवकरच ‘टेली मेडिसीन’ सेवेला प्रारंभ करण्यात येणार आहे. या अंतर्गत रुग्णांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दूरभाष केल्यावर उपचारांविषयी सल्ला देण्यात येणार आहे.

अवैध व्यवसायांना आळा घालणार्‍या कर्तव्यदक्ष पोलिसांचे स्थानांतर करून त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न ! – प्रसाद गावडे, तालुकाध्यक्ष, मनसे

कर्तव्यदक्ष पोलीस असतील, तर लाच खायला अडचण येते; म्हणून अशा पोलिसांचे स्थानांतर करण्यात येते, असे जनतेला वाटल्यास त्यात चूक काय ?

देवबाग येथील कर्ली खाडीत अवैधरित्या वाळूचा उपसा करणार्‍या ५१ जणांवर गुन्हा नोंद

निवेदन देऊनही कारवाई न झाल्याने देवबागवासियांनी अवैधरित्या वाळूचा उपसा करणार्‍या ४ होड्या पकडल्यानंतर पोलिसांकडून कारवाई !

गिर्ये येथील समुद्रातून चिनी यंत्रणा असलेली बोट पोलिसांच्या कह्यात : २ बोटी घेऊन खलाशी पसार

गिर्ये येथील समुद्रात चीनची ‘व्ही.टी.एस्.’ (व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम) यंत्रणा असलेली बोट सापडली आहे.

मुंद्रा (गुजरात) बंदरावरील अमली पदार्थांच्या विरोधातील कारवाईचे लक्ष इतरत्र वेधण्यासाठी मुंबईहून गोव्याला जाणार्‍या जहाजावर छापा ! – काँग्रेस

‘मुंद्रा (गुजरात) बंदरावरील अमली पदार्थांच्या विरोधातील कारवाईचे इतरत्र लक्ष वेधण्यासाठी ‘एन्.सी.बी.’ने मुंबईहून गोव्याला जाणार्‍या जहाजावर छापा टाकला’, असा आरोप केला.

सालसेत तालुक्यातील राय चर्चजवळ महाराष्ट्रातून एका वाहनातून अवैधपणे आणण्यात आलेला बैल पोलिसांच्या कह्यात !

बैलाची अवैधपणे वाहतूक होत आहे, ही माहिती ध्यान फांऊडेशनने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस खात्यातील अधिकार्‍याने त्वरित वाहन कह्यात घेऊन मायणा कुडतरी पोलीस ठाण्यात नेले.

१ नोव्हेंबरपासून गोव्यातील रस्त्यांवर एकही खड्डा दिसता कामा नये ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

यावर्षी मुसळधार पाऊस पडला आहे; परंतु १ नोव्हेंबरपासून गोव्यातील रस्त्यांवर खड्डे असणार नाहीत, याचे आम्ही दायित्व घ्यायला हवे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘राजकारणी, बुद्धीप्रामाण्यवादी किंवा वैज्ञानिक यांच्यामुळे विदेशी भारतात येत नाहीत, तर संतांमुळे, तसेच अध्यात्म आणि साधना शिकण्यासाठी येतात. तरीही हिंदूंना संत अन् अध्यात्म यांचे मूल्य कळलेले नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले            

उत्तरप्रदेशच्या लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसेत भाजपच्या ४ कार्यकर्त्यांसह ८ जण ठार !

उत्तरप्रदेशच्या लखीमपूर खेरी जिल्ह्यात ३ ऑक्टोबरच्या सायंकाळी झालेल्या एका हिंसक घटनेमध्ये भाजपच्या ४ कार्यकर्त्यांसह ८ जणांचा मृत्यू झाला.

राज्य संरक्षित स्मारकांमध्ये समावेश असलेल्या माहिम (मुंबई) येथील प्राचीन काशी विश्वेश्वर मंदिरातील २३६ वर्षांपूर्वीच्या मूर्ती गायब !

चौकशी अहवालात सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालयाने विश्वस्तांवर गंभीर मते नोंदवूनही पोलिसांकडून कारवाई करण्यास टाळाटाळ !