इंदूर (मध्यप्रदेश) येथे बांगलादेशी मुलींना जाळ्यात ओढून भारतात वेश्याव्यवसायामध्ये ढकलणार्‍या बांगलादेशी घुसखोराला अटक !

बांगलादेशी घुसखोर भारतात घुसून अवैध कारवाया करत असतांना भारतीय यंत्रणा झोपल्या होत्या का ?

संभाजीनगर येथील १२ वर्षांच्या मुलाला भ्रमणभाषसंच हातात दिल्याविना झोपच येत नाही !

भ्रमणभाषच्या अतीवापरामुळे होणारे दुष्पपरिणाम पहाता पालकांनी मुलांचा अभ्यास झाल्यानंतर लगेचच भ्रमणभाष काढून घेणे अपेक्षित आहे. मुलांवर लहानपणापासूनच चांगले संस्कार केल्यास त्यांना योग्य-अयोग्य समजावणे सोपे जाणार, हे पालकांनी या उदाहरणातून शिकावे.

कायदा हातात घेणार्‍यांच्या विरुद्ध कडक कारवाई करा ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री यांची चेतावणी

कुणी अविचारी तरुण कायदा हातात घेऊन अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याविरुद्ध कडक कारवाई करा, अशी ताकीद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना दिली.

‘सीएट टायर’च्या विज्ञापनातून अभिनेते आमीर खान यांचा रस्त्यांवर फटाके न फोडण्याचा संदेश !

सातत्याने हिंदूंच्या सणांच्या वेळीच असे सल्ले कसे दिले जातात ? नाताळच्या वेळीही ख्रिस्त्यांकडून रस्त्यांवर फटाके फोडले जातात, तेव्हा कुणीच का बोलत नाही ? बकरी ईदला रस्त्यावर गोहत्या केली जाते, बकर्‍याची हत्या केली जाते, तेव्हा लोक विरोध का करत नाहीत ?

भारतीय सैनिकांनी वर्ष १९७१ च्या युद्धात मिळवलेल्या विजयाची जगाच्या इतिहासात नोंद !

वर्ष १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धातील विजयाला आणि बांगलादेश निर्मितीला ५० वर्षे पूर्ण झाल्याने हे वर्ष ‘स्वर्णिम विजय वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येत आहे.

देशात कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना ५० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – सर्वोच्च न्यायालय

देशात कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० सहस्र रुपये हानीभरपाई देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे. ३० दिवसांत ही रक्कम देण्यास न्यायालयाने सांगितले आहे.

लोणंद (जिल्हा सातारा) येथे पावणेदोन लाख रुपयांचा गुटखा शासनाधीन !

अवैधरित्या गुटख्याचा साठा सापडणे गंभीर आहे. पोलिसांनी आपली कार्यक्षमता वाढवायला हवी, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

फ्रान्सच्या कॅथॉलिक चर्चमध्ये वर्ष १९५० पासून लहान मुलांचे शोषण करणारे पाद्य्रांसह सहस्रो लोक होते ! – चौकशी आयोगाचा अहवाल

विदेशामध्ये पाद्य्रांच्या वासनांधतेची आणि समलैंगिकतेची शेकडो प्रकरणे समोर आली असल्याने ‘पाद्री म्हणजे वासनांध व्यक्ती’ अशीच प्रतिमा ख्रिस्त्यांच्या मनात निर्माण होत आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये !

तक्रारदारावर दबाव आणल्याच्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचारी निलंबित !

तक्रारदारावर दबाव आणणारे पोलीस कधी सामान्यांना आधार वाटू शकतील का ?

आजपासून शाळा चालू होणार !

राज्यातील शाळा गेले दीड वर्ष कोरोना महामारीमुळे बंद होत्या. आता कोरोना महामारी नियंत्रणात आली असल्याने शासनाने ४ ऑक्टोबरपासून शाळा चालू करण्यास अनुमती दिली आहे.