पुणे येथील वेदाचार्य घैसासगुरुजी वेदपाठशाळेचे कार्य कौतुकास्पद ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

पुणे, १७ सप्टेंबर – वेदांचा प्रसार आणि प्रचार हे मोठे कार्य होत आहे. वेद जाणून घेण्यासाठी लोक विदेशातून भारतात येतात. सहस्रो वर्षांपासून येणारा हा ज्ञानप्रवाह पुढे नेण्यासाठी वेदपाठशाळेच्या माध्यमातून चालू असणारे वेदाचार्य घैसास गुरुजींचे कार्य कौतुकास्पदच आहे, असे उद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले. त्यांनी कोथरूड येथील ‘वेदाचार्य घैसास गुरुजी वेदपाठशाळे’ला १६ सप्टेंबर या दिवशी भेट दिली आणि तेथील विविध उपक्रमांची माहिती घेतली. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी त्यांनी ‘वेदभवन’ येथील अभ्यागत कक्षाचीही पहाणी केली. वेदपाठशाळेचे प्रमुख वेदाचार्य घैसासगुरुजी यांनी राज्यपालांना पाठशाळेविषयी माहिती दिली. या वेळी विश्वस्त मुकुंदराव चितळे, दत्तात्रेय सप्रे यांच्यासह प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.