१६ सहस्र लिटरपेक्षा अधिक पाणी वापरल्यास पूर्ण देयक लागू होईल ! – सार्वजनिक बांधकाम खात्याकडून अधिसूचना प्रसारित
प्रत्येक कुटुंबाला मासिक १६ सहस्र लिटर विनामूल्य पाणीपुरवठा करण्याची योजना १ सप्टेंबरपासून चालू करण्यात आली; मात्र १६ सहस्र लिटरपेक्षा अधिक पाणी वापरल्यास पूर्ण देयक भरावे लागणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम खात्याने प्रसारित केलेल्या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.