आळस टाळण्यासाठी करावयाचे उपाय

१. आळस न येण्यासाठी कोणते पदार्थ टाळावेत ?

श्री. अशोक लिमकर

‘पचायला जड असणारे पदार्थ खाल्ल्याने ग्लानी येऊन झोप येते आणि शरिरातील आळस वाढतो. त्यामुळे खालील पदार्थ खाणे टाळावे.

अ. आहारात मैद्यापासून बनवण्यात येणारे पदार्थ, उदा. व्हाईट ब्रेड, पास्ता (इटालियन पदार्थ.) इत्यादी अल्प प्रमाणातच खावेत.

आ. ‘कॉफीमधील कॅफेनचे प्रमाण वाढले, तर शरिरात आळस वाढू शकतो’, असे म्हणतात.

इ. चेरी, पिझ्झा, प्रोसेस्ड फूड (अधिक काळ टिकण्यासाठी रासायनिक प्रक्रिया करून बनविलेले पदार्थ), गोड पदार्थ किंवा मिठाई , तसेच चॉकलेट यांचे अधिक सेवन केल्यानेही झोप येऊन पर्यायाने आळस येतो.

ई. तळलेले पदार्थ अधिक प्रमाणात खाऊ नयेत.

उ. तयार फळांचे रस घेण्यापेक्षा ऋतूमानानुसार उपलब्ध फळे खावीत. लिंबू सरबत किंवा नारळाचे पाणी प्यावे.

२. खाणे, पिणे, झोपणे आणि व्यायाम यांचा समतोल राखणे आवश्यक असणे

आळस टाळण्यासाठी ‘आपले खाणे-पिणे आणि झोप यांमध्ये समतोल राखता आला, तर आपले आरोग्य चांगले राहून आळसाला चार हात दूर ठेवता येते’, असे गीतेमध्ये सांगितले आहे. त्यामुळे अधिक खाणे आणि अधिक झोपणे किंवा अल्प खाणे आणि अल्प झोपणे, हेही टाळावे. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि आवश्यक तेवढी झोप घेतल्याने आळस न्यून होतो.’

– श्री. अशोक लिमकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

(१०.४.२०१९)

धर्माची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! : www.hindujagruti.org