देवशयनी एकादशी, आवडीचा दिवस पंढरीनाथाचा ।
चोहीकडे ऐकू येत आहे, एकच गजर हरिनामाचा ।। १ ।।
भजन करत अन् वाद्ये वाजवत निघाले वारकरी विठ्ठलाच्या भेटीला ।
प्रत्येक वारकरी आतुर झाला आहे,
त्या सख्या हरीच्या दर्शनाला ।। २ ।।
एकची मागणे अन् एकची आस,
तव चरणी पंढरीराया ।
सतत लागू दे ध्यास या जिवाला,
तव चरणांचा हे पंढरीराया ।। ३ ।।
– कु. श्वेता उमेश नाईक, मडकई, गोवा. (२०.७.२०२१)