पिंपरी महापालिकेचा ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ची मूर्ती न स्वीकारण्याचा स्तूत्य निर्णय !

पिंपरी महापालिकेकडून ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ची मूर्ती स्वीकारण्यात येणार नाही, तसेच महापालिकेद्वारे संकलित केलेल्या श्री गणेशमूर्तींचे विधीवत् आणि पावित्र्य राखून विसर्जन करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

मुंबई येथे भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !

दीड दिवसाच्या येथील घरगुती श्री गणेशमूर्तींचे मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात विसर्जन करण्यात आले. श्री गणेशचतुर्थी दिवशी घरगुती आणि सार्वजनिक, अशा एकूण २ लाख श्री गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी नागरिकांना अमोनियम बायकार्बोनेट देण्याचा पुणे महापालिकेचा हिंदु धर्मशास्त्रविरोधी निर्णय !

गणेशभक्तांनो, रासायनिक पदार्थ वापरून श्री गणेशमूर्तीचे विघटन करणे, हे देवतेचे विडंबन आहे, हे लक्षात घ्या ! भक्तीभावाने पूजलेल्या श्री गणेशमूर्तीचे रसायनाच्या पाण्यामध्ये विसर्जन न करता धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यातच विसर्जन करा !

डी.एच्.एफ्.एल्. आस्थापनाकडून नीलम राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट !

दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या आस्थापनाने नीलम राणे (केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी) आणि आमदार नितेश राणे यांच्या विरोधात कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी तक्रार प्रविष्ट केली आहे.

मनसुख हिरेनला ‘फेसटाईम अ‍ॅप’च्या माध्यमातून मारण्याचे निर्देश ! – तपासात खुलासा

मनसुख हिरेन यांना मारण्यासाठी एका ‘फेसटाईम अ‍ॅप’च्या माध्यमातून निर्देश देण्यात आले होते, असे या प्रकरणाच्या आरोपपत्रात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए) म्हटले आहे. अँटिलिया प्रकरणात १० सहस्र पानांचे आरोपपत्र सादर केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात श्री गणेशमूर्तींचे उत्साहात विसर्जन !

पुणे, कोल्हापूर येथे वहात्या पाण्यात विसर्जनावर बंदी

पुणे येथे नागरिक घाटांवरून विसर्जन न करताच परतले !

पुण्यात दीड दिवसाच्या श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेकडून कोणतीही सोय नाही !

‘ई-कॉमर्स’चा हिंदुद्रोही कारभार !

केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘भारतात हिंदुविरोधी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत’, असा धाक निर्माण करायला हवा.

कनेडी-नाटळ मार्गावरील तात्पुरत्या स्वरूपाचा मल्हार पूल वाहतुकीस खुला

हा पूल कोसळल्याने नाटळ, दिगवळे, नरडवे, दारिस्ते, घोटगे आदी गावांचा संपर्क तुटला होता. कणकवली येथून या गावात जाण्यासाठी १५ कि.मी. अंतराचा फेरा पडत होता. त्यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी तातडीने या पुलासाठी ५२ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला होता.

काँग्रेसचे काश्मिरी पंडितांविषयीचे ढोंगीप्रेम जाणा !

माझेही कुटुंब काश्मिरी पंडित असल्याने काश्मिरी पंडित माझे भाऊ असून त्यांना मी साहाय्य करीन, असे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जम्मू दौर्‍याच्या वेळी दिले.