पुणे – दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या आस्थापनाने नीलम राणे (केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी) आणि आमदार नितेश राणे यांच्या विरोधात कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी तक्रार प्रविष्ट केली आहे. त्यानंतर आस्थापनाकडून घेतलेले ६५ कोटी रुपयांचे कर्ज थकवल्याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेने ‘लूकआऊट’ नोटीस पाठवली आहे.
‘आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड’ने २५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते, तसेच ‘नीलम हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड’ या आस्थापनाने ४० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते आणि त्याची देखील ३४ कोटी रुपयांपर्यंत थकबाकी आहे. याविषयी डी.एच्.एफ्.एल्. आस्थापनाने संबंधित एजन्सीकडे तक्रार केली होती. त्यानंतर ३ सप्टेंबर या दिवशी पुणे पोलिसांनी ‘लूकआऊट’ नोटीस पाठवली आहे. याविषयी पुणे गुन्हे शाखा आयुक्त म्हणाले की, आमच्याकडे तक्रार आली होती आणि त्यानंतर संबंधित न्यायालयाकडून आदेश आल्यानंतर आम्ही ‘लूकआऊट’ नोटीस पाठवून नियमांचे पालन केले आहे.