सनातनच्या ‘श्री गणेशपूजा आणि आरती’ या तेलुगु ‘ॲन्ड्रॉईड ॲप’चे उद्घाटन
भाग्यनगर (आंध्रप्रदेश) – भगवद्भक्ती केल्याने मानव जन्माचे सार्थक होते, याविषयीचे मार्गदर्शन सनातन संस्था विविध माध्यमांतून समाजाला करत असते. सनातन संस्थेने नुकतीच तेलुगु भाषेतील ‘श्री गणेशपूजा आणि आरती’ या ‘ॲप’ची निर्मिती केली आहे. यामध्ये गणेशपूजा कशी करावी ?, याविषयी विस्तृत शास्त्रोक्त माहिती दिली आहे. याचा लाभ घेतल्यास सर्वांना श्री गणेशतत्त्वाचा लाभ होईल, असे प्रतिपादन येथील ‘भगवद्गीता फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. लक्कावल वेंकट गंगाधर शास्त्री यांनी केले.
श्री. लक्कावल वेंकट गंगाधर शास्त्री यांच्या हस्ते सनातनच्या तेलुगु भाषेतील ‘श्री गणेशपूजा आणि आरती’ या ‘ॲन्ड्रॉईड ॲप’चे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनाच्या वेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी ‘प्रत्येक श्रद्धाळू व्यक्ती हा ईश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न करत असतो. त्या प्रत्येकाला आध्यात्मिकदृष्ट्या लाभ व्हावा, या दृष्टीकोनातून या ‘ॲप’ची निर्मिती करण्यात आली आहे’, हे सांगितले.
या ‘ॲप’मध्ये गणपतीची उपासना आणि त्यासंबंधी धार्मिक कृती करण्याच्या शास्त्रीय पद्धती, त्यामागील कारणे अन् त्याचे लाभ यांविषयी विस्तृत माहिती दिली आहे.
श्री गणेश ‘ॲप’ची लिंक Sanatan.org/ganeshapp