जन्माष्टमीनिमित्त उपवास करणार्‍या विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून मारहाण

  • छत्तीसगडमधील सरकारी शाळेतील प्रकार

  • शिक्षकावर निलंबनाची कारवाई

  • अशा शिक्षकाला निलंबित नाही, तर बडतर्फ आणि अटक करून कारागृहात टाकले पाहिजे; म्हणजे अन्य कुणाचेही असे कृत्य करण्याचे धाडस होणार नाही ! – संपादक 
  • ईशनिंदा रोखण्यासाठी कठोर कायदा करण्यासाठी हिंदूंनी सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे ! – संपादक 
निलंबित शिक्षक चरण मरकम (डावीकडे)

रायपूर (छत्तीसगड) – राज्यातील कोंडागाव जिल्ह्यातील बुंदापारा येथील ‘मिडल स्कूल’ या सरकारी शाळेमध्ये शिक्षकाने भगवान श्रीकृष्णाविषयी अश्लील विधाने करणे आणि उपवास ठेवणार्‍या इयत्ता ७ वी अन् ८ वीतील विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. आरोपी शिक्षक चरण मरकम याला निलंबित करण्यात आले आहे. या शिक्षकाने विद्यार्थ्यांना विचारले होते, ‘कुणी कुणी श्रीकृष्ण जयंतीनिमित्त भगवान श्रीकृष्णाची पूजा केली आणि उपवास केला आहे ?’ ज्या विद्यार्थ्यांनी असे केल्याचे सांगितले, त्यांना या शिक्षकाने मारहाण केली. विद्यार्थ्यांनी याची माहिती पालकांना दिल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.