काबुल विमानतळाच्या परिसरात इस्लामिक स्टेटकडून आक्रमणाची शक्यता

काबुल विमानतळावर अफगाणी लोकांची, तसेच परदेशी नागरिकांचीही मोठी गर्दी झाली आहे. या गर्दीवर इस्लामिक स्टेटकडून आत्मघाती आक्रमण होण्याची शक्यता अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी व्यक्त केली आहे.

बाडमेर (राजस्थान) येथे ‘मिग-२१’ लढाऊ विमान कोसळले

उडत्या शवपेट्या झालेली भारतीय वायदूलाची विमाने ! गेली अनेक दशके हीच स्थिती असतांना त्यात कोणताही सत्ताधारी राजकीय पक्ष पालट करत नाही, हे लज्जास्पद !

हिंदु धर्माचे माहात्म्य !

‘कुठे २ – ३ युगांपूर्वी धर्म शिकवणारे हिंदु धर्मातील सहस्रो ऋषी-मुनी, तर कुठे एकही ऋषी-मुनी नसणारे अन्य धर्म !’

भारतीय नौदलाच्या ९१ व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्याचे आयोजन !

लोणावळा येथील आय.एन्.एस्. शिवाजी सागरी अभियांत्रिकीच्या विशेष अभ्यासक्रमांतर्गत ९१ व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा पार पडला. भारतीय नौदलाच्या १६ अधिकारी प्रशिक्षणार्थ्यांनी १०५ आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले.

वीज दरवाढ ग्राहकांवर लादण्याऐवजी दरवाढीचा १२० कोटी रुपयांचा भार सरकार उचलणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

१२० कोटी रुपयांचा भार गोवा शासनाने उचलला म्हणजे गोमंतकीय जनता भरत असलेल्या करातूनच हा भार उचलला जाणार असल्याने याचा गोमंतकीय जनतेला काय लाभ होणार ?

‘त्वचेशी त्वचेचा संपर्क झाला नसेल, तर पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक छळाचा गुन्हा होत नाही’, हा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय रहित करा !

एका वर्षात इतक्या मोठ्या संख्येने लहान मुलींचे होणारे लैंगिक शोषण भारताला लज्जास्पद !

‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या इयत्ता ७ वीच्या पाठ्यपुस्तकात वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रकारांचा उल्लेख !

‘एन्.सी.ई.आर्.टी.’ने पाठ्यपुस्तकांतून इतिहासाचीही मोडतोड केली आहे. आधुनिक वैद्यांमध्ये किंवा त्यांच्या संघटनांमध्ये स्वतःच्या व्यवसायाविषयी जशी जागृती आहे, तशी राष्ट्र आणि धर्म यांविषयीही हवी !

विशाळगडाच्या अतिक्रमणमुक्तीसाठी ग्रामपंचायत रणदेवीवाडी आणि कसबा सांगाव अशा ३५ जणांचे ठराव प्रशासनास सादर ! 

दोन्ही ग्रामपंचायतींतील विविध सहकारी संस्था, तसेच तरुण मंडळे यांचा उत्स्फूर्त सहभाग ! विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्यात यावा, यासाठी भगवंतेश्वर मंदिरात मनसेच्या वतीने अभिषेक !

नागपूर येथे ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती विक्रीवर बंदी घालण्याला आव्हान !

मूर्तीकार संघटनेची उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट !

पुढील सुनावणी होईपर्यंत नारायण राणे यांच्यावर कारवाई न करण्याचा न्यायालयाचा आदेश

सरकारच्या विरोधात वक्तव्य न करण्याची शाश्वती देण्यास मात्र राणे यांचा नकार !