पुढील सुनावणी होईपर्यंत नारायण राणे यांच्यावर कारवाई न करण्याचा न्यायालयाचा आदेश

सरकारच्या विरोधात वक्तव्य न करण्याची शाश्वती देण्यास मात्र राणे यांचा नकार !

नारायण राणे आणि मुंबई उच्च न्यायालय

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अवमान केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर पुढील सुनावणी होईपर्यंत कारवाई करू नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. त्यावर पुढील सुनावणी होईपर्यंत राणे यांच्यावर कारवाई न करण्याचे आश्वासन राज्य सरकारने न्यायालयाला दिले आहे.

तोपर्यंत राणे यांनी सरकारच्या विरोधात वक्तव्य करू नये, याची शाश्वती देण्याची मागणी राज्य सरकारच्या अधिवक्त्यांनी न्यायालयात केली होती; मात्र शाश्वती देण्यास नारायण राणे यांनी नकार दिला आहे. पुढील सुनावणी १७ सप्टेंबर या दिवशी होणार आहे.