तक्रार केल्याप्रकरणी ६ प्राध्यापकांचे निलंबन !

१० खासगी महाविद्यालयांनी प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा मानसिक छळ केल्याचे प्रकरण, प्राध्यापकांचे विद्यापिठासमोर आंदोलन

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘हाय अलर्ट’ घोषित !

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी कायदा हातात घेणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.

गुन्हे रहित व्हावेत, यासाठी नारायण राणे यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अवमान करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात शिवसैनिकांनी तक्रारी प्रविष्ट केल्या होत्या

(म्हणे) ‘राष्ट्राविषयी अज्ञान दाखवले म्हणून बोललो !’ – राणे यांचे पत्रकार परिषद घेऊन समर्थन !

नारायण राणे म्हणाले, ‘‘दोन्ही निकाल माझ्या बाजूने लागले आहेत. देशात अद्यापही कायद्याचे राज्य आहे. भाजप माझ्यामागे खंबीरपणे उभा राहिला. मी असे काय बोललो होतो की, राग आला ? मुख्यमंत्र्यांविषयी बोललेले ते वाक्य मी परत बोलणार नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची भाजपची मागणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. त्या अनुषंगाने त्यांच्यावरसुद्धा गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी.

नागपूर येथे ५ जणांचा ‘डेल्टा प्लस’ आजाराचा अहवाल आला कोरोनामुक्त झाल्यावर !

अहवाल वेळेत न आल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे हलगर्जीपणा न करता ‘डेल्टा प्लस’चे सूत्र गांभीर्याने घेऊन महापालिकेच्या आरोग्य विभागाने काम केले पाहिजे.

नारायण राणे यांना मंत्री करणे, ही भाजपची सर्वांत मोठी चूक होती ! – आमदार दीपक केसरकर, शिवसेना

नारायण राणे यांना मंत्री करणे, ही भाजपची सर्वांत मोठी चूक होती. आतातरी भाजपने ही चूक सुधारावी आणि असे बेताल वागणार्‍या मंत्र्यांना त्यांच्या पदावरून दूर करावे, अशी प्रतिक्रिया आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केली.

निवळी (तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी) येथील पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज (वय ७० वर्षे) यांचा देहत्याग !

त्यांच्या पार्थिवावर २५ ऑगस्ट या दिवशी दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

आतंकवाद्यांना फाशीच व्हावी !

आतंकवाद्याला पकडल्यावर त्याला तात्काळ फाशीची शिक्षा न देता त्याला मांसाहारी पदार्थ खायला घालत पोसत रहाणे, हे देशातील नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.

कृतज्ञतेची जाणीव कौतुकास्पद !

दहिया यांनी भारतात परतल्याक्षणी शिव मंदिरांत जलाभिषेक, तसेच रुद्राभिषेक करून कृतज्ञता व्यक्त केली. मोठे यश संपादन केल्यानंतरही दहिया यांच्या मनामध्ये असलेली ईश्वराच्या कृपेची जाणीव कौतुकास्पद आहे.