‘माझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप आहेत !’ – आमदार प्रताप सरनाईक यांची सभागृहात मागणी

मी सत्ताधारी पक्षाचा आमदार असून माझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप आहे. त्यामुळे सरकारने मला क्लीन चिट द्यावी, अशी मागणी ‘मनी लाँड्रिंग’ प्रकरणामुळे कारवाई चालू झालेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेच्या सभागृहात केली.

महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात आणीबाणी लावत आहे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपची विधानसभेच्या बाहेर अभिरूप (प्रति) विधानसभा, विधानसभा अध्यक्षांनी कारवाई करत ‘मार्शल’ पाठवून ध्वनीक्षेपक यंत्रणा काढून घेतली.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला आव्हान देणारी ३ कृषी विधेयके विधानसभेत सादर !

केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याला महाविकास आघाडीकडून विरोध करण्यात आला होता. आता या विधेयकामध्ये काही महत्त्वाचे पालट करून राज्य सरकारने नवीन कृषी विधेयक सभागृहात सादर केले आहे.

आषाढी यात्रेच्या कालावधीत ९ दिवस पंढरपूर शहरासह १० गावांत संचारबंदी लागू !

कोरोनाच्या संसर्गामुळे सलग दुसर्‍या दिवशी होत असलेल्या आषाढी यात्रेसाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली असून १७ ते २५ जुलै या कालावधीत पंढरपूर शहरासह आसपासच्या १० गावांत संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे.

भाजपच्या प्रतिविधानसभेतील ध्वनीक्षेपक आणि माईक जप्त करण्याचा विधानसभा अध्यक्षांचा आदेश !

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवसही वादळी ठरला. पहिल्या दिवशी अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केल्यानंतर भाजपने विधीमंडळाच्या पायर्‍यावर बसून प्रतिविधानसभा घेतल्याचे पडसाद विधानसभेत उमटले.

बोगस खतांची विक्री करणार्‍या किती आस्थापनांवर कारवाई केली, याचा खुलासा सरकारने करावा ! – विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

विधान परिषद कामकाज, बोगस खतांची विक्री करणार्‍या ४२ आस्थापनांची नावे समोर आली आहेत. ‘या बोगस खतांची विक्री करणार्‍या आस्थापनांवर कारवाई करावी’, या मागणीसाठी आंदोलनेही करण्यात आली;

हिंदूंमध्ये शौर्यजागृती होण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिकणे आवश्यक ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात फसवले जात आहे. देशात विविध ठिकाणी दंगली, हत्या, बलात्कार आणि धर्मांतर यांच्या घटना घडत असून त्यात हिंदूंना लक्ष्य करण्यात येत आहे.

कराड येथे मोर्चा काढल्याच्या प्रकरणी पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि ८० धारकरी यांच्यावर गुन्हा नोंद !

संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर आणि पायी वारी यांच्या समर्थनार्थ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या नेतृत्वाखाली ५ जुलै या दिवशी कराड शहरात मोर्चा काढण्यात आला होता.

अनेक विकास महामंडळांनी २० वर्षांपूर्वींचे वार्षिक अहवाल २०२१ मध्ये पावसाळी अधिवेशनात केले सादर !

वार्षिक अहवाल वेळेत सादर न करणार्‍या मंडळांवर काय कारवाई करणार ?, ते जनतेला कळायला हवे !

विधीमंडळाच्या कामकाजाचा दर्जा खालावत चालला आहे ! – मुख्यमंत्री

विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जे घडले ते महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी लाजिरवाणे होते. ही आपली संस्कृती नाही. विधीमंडळामध्ये उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार दिला जातो;