हिंदूंमध्ये शौर्यजागृती होण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिकणे आवश्यक ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यान

श्री. हर्षद खानविलकर

वर्धा – ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात फसवले जात आहे. देशात विविध ठिकाणी दंगली, हत्या, बलात्कार आणि धर्मांतर यांच्या घटना घडत असून त्यात हिंदूंना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यामुळे हिंदूंमध्ये शौर्यजागृती करण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिकणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एका ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानाचा विदर्भातील १५ ते ३५ वर्षे वयोगटातील अनेकांनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीच्या सौ. सौख्या चौधरी यांनी केले.

उपस्थितांचे अभिप्राय

१. अजिंक्य सुरेश खुरसडे, अकोला – कार्यक्रम चांगला होता. मलाही प्रशिक्षण शिकून इतरांना शिकवावे, असे वाटत आहे.

२. कु. अंकिता ठाकरे, अमरावती – कार्यक्रम छान वाटला. शौर्य जागृत झाले.

३. कु. अर्चना नासरे, वर्धा – काळानुसार स्वरक्षण प्रशिक्षण पुष्कळ आवश्यक आहे.