सांगली – महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या १८ मे २०२१ च्या शासन परिपत्रकान्वये कोरोना केंद्रामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी मानक कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली आहे. या मानक कार्यप्रणालीचे संबंधितांनी काटेकोरपणे पालन करावे. अनुचित प्रकार घडल्यास राज्य महिला आयोगाच्या दूरभाष क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
त्यासाठीचे क्रमांक हेल्पलाईन – ७४७७७२२४२४, आयोग कार्यालय – ०२२-२६५९२७०७, आयोगाचे विभागीय कार्यालय क्रमांक – पुणे ०२० -२६३३००५२, अमरावती ०७२१ २५६६४८६, नाशिक ०२५३ – २२३७४२२, कोकण ०२२ – २५९१७६५५, नागपूर – ०७२१ – २६४००५०, संभाजीनगर – २४० – २३२५५७० या प्रमाणे आहेत.
मानक कार्यप्रणालीतील काही सूत्रे
१. महिलांसाठी स्वतंत्र प्रभाग असणे आवश्यक असून त्यात पुरुष साहाय्यकाची नियुक्ती करण्यात येऊ नये.
२. महिलांच्या कक्षाची स्वच्छता करण्यासाठी महिला कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात यावी.
३. महिला कक्षामध्ये रात्रीच्या वेळी महिला साहाय्यक असणे आवश्यक आहे. महिला कक्षेत पुरुष साहाय्यकाची नियुक्ती करण्यात येऊ नये.
४. प्रवेश द्वारांवर सुरक्षारक्षक असणे आवश्यक आहे. या केंद्रात प्रवेश करणार्या व्यक्तीची नोंद नोंदवहीत करावी.
५. महिला कक्षात महिला तक्रार निवारण समिती असणे आवश्यक आहे. जेणेकरून कोणत्याही महिलेला तक्रार करणे सुलभ होईल.