सोलापूर – शहरातील दळणवळण बंदी उठवून सर्व दुकाने, बाजारपेठा, उद्योगधंदे चालू करण्याच्या मागणीसाठी व्यापार्यांनी सोलापूर महानगरपालिकेसमोर २ जून या दिवशी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात माजी आमदार दिलीप माने, नगरसेवक आनंद चंदनशिवे, अमोल शिंदे, तसेच व्यापारी संघटनेचे नेते, पदाधिकारी आणि व्यापारी सहभागी झाले होते. त्यानंतर व्यापारी वर्गाच्या शिष्टमंडळाने आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन शहरातील सर्व बाजारपेठा खुल्या करण्याची मागणी केली. या वेळी ‘आयुक्त चले जाव’, असा नारा व्यापार्यांनी दिला. या वेळी सदर बाझारला पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना कह्यात घेऊन नंतर मुक्तता केली.