कोणत्याही धर्माचा प्रसार करतांना इतर धर्मांची विटंबना करण्याचे अधिकार कोणत्याही धर्माला नाहीत ! – कर्नाटक उच्च न्यायालय

ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी गीता आणि कुराण यांविषयी अपशब्द काढल्याच्या विरोधात हिंदु महिलेने केलेली तक्रार मागे घेण्यासाठी प्रविष्ट केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली !

ख्रिस्ती धर्मप्रचारकांकडून अन्य धर्मांचा विशेषतः हिंदु धर्माचा विरोध केला जातो. त्याची हेटाळणी केली जाते. याविषयी कधीही देशातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

बेंगळुरू (कर्नाटक) – कोणत्याही धर्माचा प्रसार करतांना इतर धर्मांची विटंबना करण्याचा मूलभूत अधिकार कोणत्याही धर्माला दिला जात नाही. कोणत्याही धर्मगुरूंनी किंवा कोणत्याही व्यक्तीने स्वत:च्या धर्माचा प्रसार करतांना इतर धर्मांची विटंबना होऊ नये याची दक्षता घ्यावी, असे मत कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एच्.पी. संदेश यांनी व्यक्त केले आहे. धर्माच्या अप्रतिष्ठेचा आरोप करणारी फौजदारी तक्रार रहित करण्याची आरोपींनी केलेली मागणी फेटाळून लावतांना त्यांनी हे वक्तव्य केले.

१. एका हिंदु महिलेने तक्रार केली आहे की, ख्रिस्ती धर्मप्रचारक तिच्या निवासस्थानी आले आणि त्यांनी इतर धर्मांची अपकीर्ती केली. तिने असे म्हटले की, श्रीमद्भगवदगीता किंवा कुराण दोघांमुळे शांती मिळणार नाही. आपत्काळात येशू ख्रिस्ताखेरीज अन्य कुणीही संकटातून सुटका करण्यास येणार नाही. (असे आहे, तर आज कोरोनामुळे अमेरिका आणि युरोप येथे लाखो ख्रिस्त्यांचा मृत्यू झाला, त्यांना येशूने का वाचवले नाही ?, याचे उत्तर ते देतील का ? – संपादक)

२. ख्रिस्ती धर्मप्रचारक आरोपींनी या तक्रारीची नोंद घेण्यासाठी दिलेला आदेश रहित करावा, यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. या आदेशामुळे भारतीय घटनेच्या १४,२१ आणि २५ व्या कलमाचे उल्लंघन झाले आहे, असे त्यांनी याचिकेत म्हटले होते.

३. या याचिकेवर उच्च न्यायालयाने नमूद केले की, आरोपींची विधाने अन्य धर्मांच्या धार्मिक भावनांना दुखावण्याच्या हेतूने केल्याचे दर्शवतात. जेव्हा अशा प्रकरणात तथ्य असते, तेव्हा भारतीय दंड विधानाच्या कलम २९८ नुसार (धर्मभावना दुखावणे) तो गुन्हा ठरतोे. त्यामुळे फौजदारी तक्रार रहित करण्याची याचिका फेटाळून लावली जात आहे.