सप्तर्षींच्या आज्ञेने अक्षय्य तृतीयेच्या शुभदिनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली. ध्वजारोहण करण्यापूर्वी धर्मध्वजाची विधीवत् पूजा करण्यात आली. धर्मध्वजाची स्थापना करतांना सौ. योया वाले यांना जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. भाव
१ अ. भावाचे वलय श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या अनाहतचक्रस्थानी कार्यरत होणे : ‘धर्मध्वजातील सर्व स्पंदने (शक्ती) जगभरात प्रवाहित होऊन सर्वत्र ‘ईश्वरी राज्य’ यावे आणि सर्वत्रच्या साधकांची साधना व्हावी’, असा त्यांचा भाव असल्याने असे झाले.
२. तारक शक्ती
२ अ. तारक शक्तीचे वलय धर्मध्वजात कार्यरत होणे : ध्वजारोहण करण्यापूर्वी करण्यात आलेल्या विधीवत् पूजेमुळे तारक शक्ती धर्मध्वजात आकृष्ट झाली.
२ आ. तारक शक्तीचे कवच धर्मध्वजाभोवती असणे : धर्मध्वजाची पूजा करतांना करण्यात आलेल्या संकल्पामुळे, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आशीर्वादामुळे असे झाले असून ही तारक शक्ती धर्मध्वजात कायमस्वरूपी रहाणार आहे.
२ इ. तारक शक्तीचे कण धर्मध्वजातून वातावरणात प्रक्षेपित होणे : साधकांचे वाईट शक्तींपासून रक्षण व्हावे, साधकांची साधना व्हावी आणि धर्मप्रसारातील सर्व अडथळे दूर होऊन ‘ईश्वरी राज्या’ची स्थापना व्हावी, यांसाठी असे झाले आहे.
३. श्रीरामतत्त्व
३ अ. श्रीरामतत्त्वाचे वलय धर्मध्वजात कार्यरत होणे : धर्मध्वजावर एका बाजूला श्रीरामाचे चित्र असून ‘ईश्वरी राज्या’च्या स्थापनेसाठी आवश्यक श्रीरामतत्त्व मिळण्यासाठी असे झाले.
३ आ. श्रीरामतत्त्वाच्या लहरी वातावरणात प्रक्षेपित होणे : धर्मप्रसाराच्या कार्याला गती मिळून अधिकाधिक व्यापक स्तरावर समष्टी कार्य व्हावे, साधकांचे वाईट शक्तींपासून आणि आपत्काळात रक्षण व्हावे, तसेच ईश्वरी राज्या’च्या स्थापनेसाठी आवश्यक रामाचे तत्त्व मिळावे, यांसाठी असे झाले.
४. गुरुतत्त्व
४ अ. गुरुतत्त्वाचे वलय धर्मध्वजात कार्यरत होणे : धर्मध्वजाच्या एका बाजूला श्रीरामाच्या वेशातील परात्पर गुरु डॉ.आठवले यांचे चित्र आहे, तसेच साधकांची साधना व्हावी आणि ‘ईश्वरी राज्या’ची स्थापना व्हावी, यांसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प कार्यरत आहे, यांमुळे असे झाले आहे.
४ आ. गुरुतत्त्वाचे कण धर्मध्वजातून वातावरणात साधकांकडे प्रक्षेपित होणे : सर्वत्र धर्मप्रसाराचे समष्टी कार्य वाढावे, यासाठी असे झाले.
५. चैतन्य
५ अ. चैतन्याचे वलय धर्मध्वजात प्रकाशमान स्वरूपात कार्यरत होणे
५ आ. चैतन्याचा प्रवाह व्यापक स्वरूपात चारही दिशांनी वातावरणात प्रक्षेपित होणे
५ इ. चैतन्याच्या चक्राकार लहरी धर्मध्वजाच्या स्तंभाभोवती प्रवाहित होणे : या लहरी स्तंभामध्ये आणि स्तंभाभोवती अधो अन् ऊर्ध्व दिशेने सतत प्रवाहित होत आहेत.
६. देवीतत्त्व
६ अ. देवीतत्त्वाचे वलय श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मुखाभोवती कार्यरत होणे : याचे कारण त्यांच्यात देवीतत्त्व आहे.
७. आनंद
७ अ. आनंदाचे वलय श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मुखाभोवती कार्यरत होणे : ‘धर्मध्वजातील शक्तीचा सर्व साधकांना आध्यात्मिक स्तरावर लाभ व्हावा आणि ‘ईश्वरी राज्या’ची स्थापना व्हावी’, असा त्यांचा समष्टी भाव असल्याने असे झाले.
८. इतर सूत्रे
अ. ध्वजारोहण करण्यापूर्वी आरंभी धर्मध्वजाची विधीवत् पूजा करण्यात आली. ध्वजात चांगली स्पंदने आकृष्ट होऊन ती कार्यरत व्हावीत, हा यामागे उद्देश होता. ध्वजारोहण करतांना ही स्पंदने व्यापक स्वरूपात सर्वत्र प्रवाहित झाली. त्यामुळे धर्मध्वजाकडे पाहिल्यावर चांगले वाटत होते आणि आध्यात्मिक लाभ होतात.
आ. धर्मध्वजातील स्पंदने ईश्वराकडे प्रवाहित होऊन ती सर्व साधकांकडे, अगदी विदेशातील साधकांकडेही प्रवाहित झाली.
इ. ध्वजारोहण करतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना श्रीराम आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवले. परात्पर गुरु डॉ. आठवले धर्मध्वजाकडे पहात असल्याचेही त्यांना जाणवले.
ई. आरंभी सभोवताली वातावरणात वाईट शक्तींचे अस्तित्व होते; परंतु धर्मध्वज आणि त्याचा स्तंभ यांतून पुष्कळ प्रमाणात चांगली शक्ती प्रक्षेपित होत असल्याने त्या दूर पळाल्या.
उ. धर्मध्वजाच्या एका बाजूला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे श्रीरामाच्या रूपातील चित्र आहे; कारण ते श्रीरामाशी एकरूप झाले आहेत आणि ते पुरुषोत्तम आहेत. त्यामुळे संपूर्ण जगभरात धर्मप्रसाराचे कार्य वाढण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आशीर्वाद सर्वदूर असलेल्या साधकांना मिळतील.’
– एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले (१९.५.२०२१)
|