विश्‍वाला दिशा देण्याची क्षमता ब्रह्मज्ञानी महापुरुषांमध्ये असते ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र कार्य प्रशिक्षण कार्यशाळे’च्या अंतर्गत उत्तर भारतात ३ कार्यशाळांचे आयोजन

निवृत्तीच्या ४ वर्षांनंतर दोघा ब्रिगेडिअर्सना सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर बढती !

अशी घटना सैन्याला लज्जास्पद आहे ! याला उत्तरदायी असणार्‍या सर्व अधिकार्‍यांना शिक्षा झाली पाहिजे !

पश्‍चिम बंगाल येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील पसार धर्मांधाला ठाणे येथे अटक !

बंगाल येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील पसार आरोपी मलिक फकीर मीर याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून अटक केली आहे. त्याला न्यायालयात उपस्थित केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

सराईत गुंडाला पोलिसांवर आक्रमण करून पळून जाऊ देणार्‍या भाजपच्या माजी पदाधिकार्‍याला अटक

अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, म्हणजे इतरांवर वचक बसेल !

सनातनच्या कुडाळ येथील साधिका श्रीमती नलंदा खाडये यांचे निधन

श्रीमती नलंदा खाडये यांचे पूर्ण कुटुंबच सनातनच्या माध्यमातून साधनारत आहे. श्रीमती खाडये या गेली २४ वर्षे साधना करत होत्या. दिवसभरातील ६ ते ८ घंटे व्यष्टी साधना, दैनिक वाचन, प्रतिदिन अग्निहोत्र करणे हा त्यांचा नियमितचा दिनक्रम असे.

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात आज राज्यात १ सहस्र ठिकाणी आंदोलन करणार ! – नाना पटोले, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

मोदी सरकारने पेट्रोल-डिझेल यांमधून कररूपाने कोट्यवधी रुपयांचा आर्थिक लाभ मिळवून सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे.

कल्याण येथे बनावट निवडणूक ओळखपत्रांचा साठा हस्तगत !

कामेश मोरे याच्या विरोधात बनावट मतदार ओळखपत्रे सिद्ध केली म्हणून खडकपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद केला आहे.

नागूपर जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’चे ८४ टक्के रुग्ण !

पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वर्धा या ६ जिल्ह्यांमध्ये ‘म्युकरमायकोसिस’चे १ सहस्र ४४१ रुग्ण आढळले आहेत.

गडचिरोलीतील ‘मद्यबंदी’विषयीचा निर्माण झालेला गोंधळ आणि संशय मुख्यमंत्र्यांनी दूर करावा !

गडचिरोली जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात सर्वत्र मद्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊन नागरिकांचे आरोग्य बिघडते, या सत्याचा सरकारने विचार करून उचित निर्णय घ्यावा !

माणगंगा नदीपात्रातील ८०० वर्षांपूर्वीच्या स्नानकुंडाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष !

स्नानकुंडातील पवित्र तीर्थाचे आध्यात्मिक स्तरावर अनेक लाभ आहेत. तीर्थाचा भाविकांना लाभ होण्यासाठी प्रशासनाने कुंडाचा जीर्णोद्धार लवकर करावा, ही अपेक्षा ! संघटनांनी जीर्णोद्धार होईपर्यंत पाठपुरावा करावा !