अशी घटना सैन्याला लज्जास्पद आहे ! याला उत्तरदायी असणार्या सर्व अधिकार्यांना शिक्षा झाली पाहिजे !

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर सैन्यातील २ ब्रिगेडिअर्स निवृत्त झाल्यानंतरच्या ४ वर्षांनी त्यांना बढती देऊन मेजर जनरल करण्यात आले आहे. सैन्यात असतांना त्यांची बढती २ वर्षे प्रलंबित होती. नलिन भाटिया आणि व्ही.एन्. चतुर्वेदी अशी त्यांची नावे आहेत.
Brigadiers promoted to Major General rank four years after retirement
Read @ANI Story | https://t.co/LarHLAfuw8 pic.twitter.com/cqcpZ5WF0S
— ANI Digital (@ani_digital) June 5, 2021
या दोघांनी सशस्त्र बल न्यायाधिकरणाकडे दाद मागितली होती; मात्र तेथे त्यांची मागणी फेटाळण्यात आल्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. त्यांना बढती का देण्यात आली नाही ? याची ‘माहिती अधिकारा’तून माहिती मागवण्यात आल्यावरही उत्तर देण्यात आले नव्हते. (जर असे होणार असेल, तर त्याला माहितीचा अधिकार कसे म्हणायचे ? ही मोगलाईच म्हणावी लागेल ! – संपादक) या सैन्याधिकार्यांच्या अधिवक्त्यांनी आरोप केला की, तत्कालीन सैन्यदलप्रमुख या दोघांना पूर्वीच्या सैन्यदलप्रमुखांच्या जवळच्या व्यक्ती समजत होते. त्यामुळे त्यांना दुर्लक्षित करण्यात आले.
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
तमिळनाडूमध्ये गाय आणि वासरू यांच्या हत्येवर उच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीला सर्वाेच्च न्यायालयाकडून स्थगिती
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिर दान चोरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची केंद्र आणि उत्तरप्रदेश सरकार यांना नोटीस