६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. यशवंत सहस्रबुद्धे यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना आणि साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये अन् शिकायला मिळालेली सूत्रे

श्री. यशवंत सहस्रबुद्धे

‘१४.६.२०२० या दिवशी श्री. यशवंत अनंत सहस्रबुद्धे यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाली. श्री. यशवंत अनंत सहस्रबुद्धे यांचे संपूर्ण कुटुंब (पत्नी, मुलगी, मुलगा आणि स्नुषा) सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहे. त्यांना जाणवलेली काही गुणवैशिष्ट्ये आपण २८ एप्रिल या दिवशी पाहिली आज या लेखातील उर्वरित सूत्रे पाहूया.

२८ एप्रिल या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखातील सूत्रे वाचण्यासाठी या लिंक वर किल्क करा : https://sanatanprabhat.org/marathi/472367.html

४. सौ. मानसी महेंद्र सहस्रबुद्धे (श्री. यशवंत सहस्रबुद्धे यांची स्नुषा)

सौ. मानसी सहस्रबुद्धे

४ अ. प्रेमभाव असणे : ‘बाबांनी मला गेल्या १५ वर्षांत कधीच त्यांची सून म्हणून वेगळी वागणूक दिलेली नाही. त्यांनी मला मुलीपेक्षाही अधिक प्रेम दिले आहे. त्यांच्यात मुळातच पुष्कळ प्रेमभाव आहे. त्यामुळे ते कुणावरही निरपेक्ष प्रेम करतात.

४ आ. जवळीक साधण्याची कला असणे : त्यांच्यामध्ये आरंभीपासूनच सर्वांशी जवळीक साधण्याची कला आहे. कुटुंबीय, नातेवाईक आणि समाज यांतील सर्वच वयोगटातील व्यक्ती यांच्याशी ते सहजतेने जवळीक साधतात. त्यामुळे आजपर्यत त्यांनी ज्या ज्या ठिकाणी सेवा केली आहे, तेथील साधक त्यांची नेहमी आठवण काढतात.

४ इ. प्रत्येक प्रसंगात सकारात्मक रहाणे : प्रत्येक प्रसंगात ते सकारात्मक राहून विचार करतात. ‘देवाला काय अपेक्षित आहे ?’, ते केले पाहिजे’, असा ते विचार करतात. प्रसंगात उपाययोजना काढून त्यातून बाहेर पडण्याकडे ते लक्ष देतात.

४ ई. नियोजनबद्धता असणे : व्यावहारिक आणि आध्यात्मिक सर्वच कृतींमध्ये त्यांचे नियोजन नेहमी सिद्ध असते. कुठेही प्रवासाला जायचे असल्यास त्याची सर्व सिद्धता ते दोन दिवस आधीपासूनच करून ठेवतात. घरी श्राद्ध-पक्ष असले की, त्याच्या स्वयंपाकासाठी लागणार्‍या जिन्नसांपासून ते पूजासाहित्याच्या सिद्धतेपर्यंत सर्व साहित्य आहे ना, याची ते स्वतः निश्‍चिती करतात आणि न्यून-अधिक असल्यास सिद्धता करून ठेवतात. त्यामुळे प्रत्यक्ष विधी होत असतांना कोणतीही अडचण येत नाही. त्या कृतीतून सर्वांनाच आनंद मिळतो.

४ उ. स्वावलंबी असणे : ते स्वतःची कामे स्वतःच करतात. घरातील सर्वच कामे स्वच्छता करणे, बाजारहाट करणे, अगदी स्वयंपाकही सिद्ध करणे आणि कपड्यांना इस्त्री करणे इत्यादी ते स्वतः मनापासून आणि आवडीने करतात.

४ ऊ. शिकण्याची वृत्ती असणे : संगणक, भ्रमणभाष यांमधील बरेचसे तात्त्विक ज्ञान (‘अ‍ॅप’) वापरणे यात त्यांनी कौशल्य प्राप्त केले आहे.’

५ . श्री. राजेंद्र सांभारे यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

श्री. राजेंद्र सांभारे

५ अ. प्रेमळ, लाघवी आणि शांत स्वभाव असलेले अन् सेवेसाठी सतत प्रोेत्साहन देणारे व्यक्तीमत्त्व असणे

‘वर्ष २०१३ – १४ मध्ये सहस्रबुद्धेकाका सातारा जिल्ह्यातील  समन्वय सेवेसाठी आले होते. तेव्हा मला त्यांचा सहवास लाभला होता. त्यांच्यातील ‘शांत, हळू आवाजात बोलणे, प्रेमळ, लाघवी आणि सेवेसाठी सतत प्रोत्साहन देणे’, असे गुण मला जाणवले.

५ आ. प्रायोजक मिळवून हस्तपत्रकांच्या सेवेची संधी उपलब्ध करून समष्टी कार्यात मोलाचे सहकार्य करणे

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हस्तपत्रके सातारा येथून एकत्रित छपाई करून ‘एस्.टी. पार्सल’ने पाठवली जातात. त्यांनी या सर्व कार्यास प्रायोजक मिळवून दिला. एक विभागीय स्वरूपातील सेवेची संधी काकांनी चालू केली आणि समष्टी कार्यात मोलाची भर घातली. या पाच जिल्ह्यांचा वेळ आणि श्रम वाचवून आर्थिक खर्च विरहित लाभ झाला अन् प्रसारकार्याला गती मिळाली. काकांनी माझ्यासारख्या सामान्य साधकातील गुणांची पारख करून मला सेवेची संधी देऊन साधनेतील आनंद मिळवून दिला.

५ इ. माझ्या आध्यात्मिक प्रगतीत काकांचे मोलाचे साहाय्य झाले. ‘श्री. सहस्रबुद्धेकाका लवकरात लवकर संतपदी विराजमान होवोेत’, अशी श्री गुरुचरणी प्रार्थना करतो.’

६. सौ. नीता बोरामणीकर यांना शिकायला मिळालेले सूत्रे

आरंभीच्या काळात श्री. यशवंत सहस्रबुद्धे पुणे जिल्ह्यात सेवा करत होते. त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

६ अ . प्रेमभाव आणि मोकळेपणा

‘श्री. यशवंत सहस्रबुद्धेकाका सर्व साधकांशी मोकळेपणाने बोलत असत. त्यामुळे काकांचा कधी ताण आला नाही. सेवेत माझ्या चुका झाल्या, तरी काका समजावून सांगत असत. जिल्हा वहीची सेवा करतांना ते स्वतः त्याविषयीचा अहवाल कसा करायचा, हे प्रत्यक्ष करून दाखवायचे. सेवेत अडचण आली, तर काका ती सोडवण्यासाठी साहाय्य करत.

६ आ. जवळीक साधणे

काका आमच्या घरी आल्यानंतर माझ्या सासर्‍यांशीसुद्धा मोकळेपणाने बोलत. त्यामुळे तेही ‘काका बर्‍याच दिवसांत आले नाहीत’, अशी त्यांची विचारपूस करतात.’